शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

पालघरमध्ये भाजपाची कोंडी; शिवसेनेपाठोपाठ काँग्रेसकडे मदतीसाठी विनंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2018 12:49 IST

शिवसेनेनं दुर्लक्ष केल्यानं पालघरमध्ये भाजपानं काँग्रेसकडे मदतीची विनंती केली आहे

पालघर: भाजपाचे खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनानं रिक्त झालेल्या पालघर लोकसभा मतदारसंघात भाजपाची कोंडी झालीय. चिंतामण वनगा यांचे पुत्र श्रीनिवास वनगा यांना शिवसेनेनं उमेदवारी दिल्यानं अडचणीत सापडलेल्या भाजपानं आता काँग्रेसकडे पाठिंबा मागितलाय. पालघरमध्ये पाठिंबा द्या आणि पलूसमध्ये पाठिंबा घ्या, अशी ऑफर भाजपाकडून काँग्रेसला देण्यात आलीय. याआधी भाजपानं पालघरमधील पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेलाही गळ घातली होती. वनगा कुटुंबीयांना भाजपमध्ये पाठवा, आम्ही त्यांचं पुनर्वसन करू, असा प्रस्ताव भाजपनं शिवसेनेला दिला होता.

श्रीनिवास वनगा यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानं भाजपाच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे भाजपानं काँग्रेसचे नेते राजेंद्र गावित यांना पक्षात प्रवेश देऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं. मात्र गावित यांनी अद्याप उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाही. या ठिकाणी भाजपाची विचित्र कोंडी झालीय. त्यामुळे शिवसेनेनं वनगा कुटुंबियांना भाजपामध्ये पाठवावं, त्यांना भाजपाकडून विधानपरिषदेत संधी दिली जाईल, असा प्रस्ताव भाजपाकडून शिवसेनेला देण्यात आला. मात्र अद्याप शिवसेनेनं या प्रस्तावाला कोणताही प्रतिसाद दिलेला नाही.शिवसेनेनं पालघरमध्ये कुरघोडी केल्यानं आता भाजपानं काँग्रेसला मदतीची विनंती केलीय. पालघरमध्ये पाठिंबा द्या आणि पलूस विधानसभा पोटनिवडणुकीत मदत मिळवा, असा प्रस्ताव भाजपाकडून काँग्रेसला देण्यात आलाय. काँग्रेस नेते पतंगराव कदम यांच्या मृत्यूमुळे पलूसमध्ये पोटनिवडणूक होतेय. याठिकाणी काँग्रेसनं पतंगराव कदम यांचे पुत्र विश्वजित कदम यांना उमेदवारी दिलीय. पलूसमधील निवडणूक बिनविरोध व्हावी, असा काँग्रेसचा प्रयत्न आहे. त्यामुळे भाजपाचा प्रस्ताव काँग्रेस स्वीकारणार का?, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पालघरमध्ये शिवसेनेचे श्रीनिवास वनगा, भाजपचे राजेंद्र गावित आणि काँग्रेसचे दामोदार शिंगडा अशी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.  

टॅग्स :Palghar bypoll 2018पालघर पोटनिवडणूक 2018Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाUddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस