शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत आणि चीन युक्रेन युद्धाला निधी देत ​​आहेत"; तेल खरेदीवरून डोनाल्ड ट्रम्प यांचा UNGA मध्ये मोठा आरोप
2
"भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे संपवली, पण कोणत्याही पंतप्रधानांनी मदत केली नाही," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
3
PAK vs SL War of Celebration :पाक गोलंदाजाने कळ काढली; हसरंगानं त्याचा बदला घेतला, पण... (VIDEO)
4
रशिया कसं थांबवेल युक्रेन युद्ध? ट्रम्प यांनी UNGA मध्ये सांगितला अमेरिकेचा प्लॅन; पुतिन यांचं टेन्शन वाढणार!
5
पाक गोलंदाजानं केली हसरंगाची कॉपी! मग IND vs PAK मॅचचा दाखला देत इरफाननं काढली 'लायकी' (VIDEO)
6
वैभव खेडेकरांच्या BJP प्रवेशाचा मुहूर्त मिळेना; कार्यकर्त्यांसह मुंबई गाठली पण पक्षप्रवेश नाही
7
पाकिस्तानच्या जाफर एक्सप्रेसमध्ये स्फोट; ट्रेन रुळावरून घसरुन उलटली, काही तासांपूर्वीच लष्कराला करण्यात आलं होतं लक्ष्य
8
बिग सरप्राइज! थेट टीम इंडियाची कॅप्टन्सी मिळाली अन् दिनेश कार्तिक पुन्हा मैदानात उतरण्यास झाला तयार
9
लग्नानंतर वैवाहिक संबध ठेऊ शकला नाही पती, पत्नीनं नपुंसक असल्याचा आरोप करत केली 2 कोटींची मागणी अन् मग...
10
IND vs PAK: पाकिस्तानच्या 'चिल्लर पार्टी'ला हरभजनचा इशारा, म्हणाला- थोडे मोठे व्हा नि मग...
11
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
12
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
13
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
14
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
15
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
16
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
17
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
18
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
19
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
20
चिंताजनक! लहानपणीच्या 'या' छोट्याशा निष्काळजीपणामुळे ५०% वाढतो हृदयरोगाचा धोका

पालघर विभागाला ९५ लाख १३ हजारांचा तोटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 01:19 IST

मुसळधार पावसाने बसफेऱ्या रद्द; परिवहन महामंडळाचे जिल्ह्यात ८ आगार; आर्थिक गणित कोलमडणार

- हितेन नाईकपालघर : राज्य परिवहन महामंडळाच्या पालघर विभागांतर्गत आगारातून दररोज ४२५ बस गाड्यांच्या ३ हजार ३७४ फेरीद्वारे १ लाख ४३ हजार कि.मी.चा पल्ला गाठला जातो. मात्र, आठवडाभरापासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे पालघर विभागाच्या ३ हजार ६१३ फेºया रद्द झाल्या. यामुळे महामंडळाला सुमारे ९५ लाख १३ हजार ९९ रुपयांचा तोटा सहन करावा लागला आहे.पालघर जिल्ह्यात राज्य परिवहन महामंडळाचे एकूण आठ बस आगार (डेपो) आहेत. १ आॅगस्टपासून जिल्ह्यात जोरदार अतिवृष्टी होत स्थानिक आणि लांब पल्ल्याच्या हजारो फेºया रद्द झाल्या आहेत. ३ आॅगस्ट रोजी पालघर आगारातील २२२ बस फेºया रद्द झाल्या असून १० हजार ९२० कि.मी. रद्द झाले आहेत तर ४ आॅगस्ट रोजी ३६४ बस फेºया रद्द होत १५ हजार ८७० किमी तर ५ आॅगस्ट रोजी ३१ फेºया रद्द होत ३ हजार ०९ कि.मी. रद्द झाले आहेत.सफाळे आगारातील ३ आॅगस्ट रोजी १४६ फेºया रद्द होत ३ हजार ३१० किलो मीटरचा प्रवास रद्द झाला आहे. तर ४ आॅगस्ट रोजी १४८ फेºया रद्द होत १ हजार ८७५ किलोमीटरचा प्रवास रद्द झाला आहे. तर ५ आॅगस्ट रोजी ४ फेºया रद्द होत त्यांचे ३६० किलो मीटरचा प्रवास रद्द झाल्याचे विभागीय वाहतूक अधिकारी आशिष चौधरी यांनी लोकमतला सांगितले.वसई आगारातील १२७ फेºया रद्द झाल्या असून ५ हजार ५३७ किलो मीटरचा प्रवास रद्द करण्यात आला आहे. ४ आॅगस्ट रोजी ३३१ फेºया रद्द होत १६ हजार ९६८ कि.मी. प्रवास रद्द करण्यात आला आहे तर ५ आॅगस्ट रोजी ७२ फेरीद्वारे ५ हजार २२५ कि.मी. प्रवास रद्द झाला आहे.३ आॅगस्ट रोजी अर्नाळा विभागातील ४६ फेºया रद्द झाल्या असून ४ हजार ७३९ कि.मी. प्रवास रद्द झाला. ४ आॅगस्ट रोजी २९२ फेºया रद्द होत १९ हजार १२४ कि.मी. प्रवास रद्द झाला आहे तर ५ आॅगस्ट रोजी ४० फेºया रद्द होत ५ हजार १५७ कि.मी.चा प्रवास रद्द करण्यात आला आहे.डहाणू आगार अंतर्गत १०८ फेºया रद्द झाल्या असून २ हजार ७८२ कि.मी. प्रवास रद्द झाला आहे. ४ आॅगस्ट रोजी १७४ फेºया रद्द झाल्या असून ६ हजार ०३० कि.मी.चा प्रवास रद्द झाला आहे. तर ५ आॅगस्ट रोजी ५८ फेºया रद्द होत २ हजार ९१७ कि.मी.चा प्रवास रद्द झाला आहे.जव्हार आगार अंतर्गत ३ आॅगस्ट रोजी १३२ फेºया रद्द होत ६ हजार १६१ कि.मी. रद्द झाले असून ४ आॅगस्ट रोजी १३५ फेºया रद्द होत १३ हजार ०३४ कि.मी.चा प्रवास रद्द झाला आहे. तर ५ आॅगस्ट रोजी १०५ फेºया रद्द होत ५ हजार २६६ कि.मी.चा प्रवास रद्द झाला आहे.बोईसर आगार अंतर्गत ३ आॅगस्ट रोजी १३२ फेºया रद्द होत ३ हजार ३९१ किलो मीटरचा प्रवास रद्द झाला असून ४ आॅगस्ट रोजी ३०५ फेºया रद्द होत ८ हजार २३६ किलो मीटरचा प्रवास रद्द झाला आहे तर ५ आॅगस्ट रोजी १२९ फेºया रद्द झाल्या असून ३ हजार ९५६ कि.मी.चा प्रवास रद्द झाला आहे.नालासोपारा विभागांतर्गत ३ आॅगस्ट रोजी १०० फेºया रद्द झाल्या. ४ आॅगस्ट रोजी १४६ फेºया रद्द होत १३ हजार ८८७ किलो मीटरचा प्रवास रद्द झाला आहे तर ५ आॅगस्ट रोजी ६६ फेºया रद्द होत ९ हजार ३४३ किलो मीटरचा प्रवास रद्द झाला आहे.दररोज ३ हजार ३७४ फेºयापालघर आगारातून ६९२ दैनंदिन फेºया होतात. सफाळे आगारातून ४२७ दैनंदिन फेरीद्वारे ७ हजार ६७६ किलो मीटरचा पल्ला गाठला जातो. वसई आगारातून ३५८ फेºयाद्वारे २० हजार १४५ किलो मीटरचा पल्ला गाठला जातो. अर्नाळा विभागातून २९८ फेरीद्वारे २२ हजार ६५५ कि.मी.चा पल्ला गाठला जातो. डहाणू आगारातून ४४५ फेºयाद्वारे १६ हजार ४० किलोमीटर, जव्हार आगारातील ४५७ फेºयाद्वारे १९ हजार ६३६ किलोमीटर, बोईसर आगारातून ५५५ फेºयाद्वारे २२ हजार ३८ कि.मी. तर नालासोपारा आगारातील १४६ फेºयाद्वारे १३ हजार ८८७ कि.मी.चा पल्ला असा एकूण पूर्ण पालघर विभागांतर्गत ३ हजार ३७४ दैनंदिन फेºयाद्वारे १ लाख ४३ हजार ३६ कि.मी.चा पल्ला दररोज एसटीद्वारे गाठलाजात आहे.आमच्या हक्काच्या उत्पन्नापासून आम्हाला मुकावे लागले असून आता येणाºया सणाच्या निमित्ताने जादा फेºया वाढवून हे नुकसान भरून काढण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू. - अजित गायकवाड, विभाग नियंत्रक, पालघर विभाग

टॅग्स :state transportएसटी