खटले निकाली काढण्यासाठी पालघरला लोकन्यायालय
By Admin | Updated: April 4, 2016 01:48 IST2016-04-04T01:48:30+5:302016-04-04T01:48:30+5:30
ठाणे, पालघर जिल्ह्यांतील प्रलंबित खटले निकाली काढण्यासाठी ९ एप्रिल रोजी या दोन्ही जिल्ह्यांत राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात येत आहे

खटले निकाली काढण्यासाठी पालघरला लोकन्यायालय
पालघर : ठाणे, पालघर जिल्ह्यांतील प्रलंबित खटले निकाली काढण्यासाठी ९ एप्रिल रोजी या दोन्ही जिल्ह्यांत राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात येत आहे.
जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये या लोकन्यायालयाचे आयोजन जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.के. कोतवाल यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार आहे.
या राष्ट्रीय लोकन्यायालयात दिवाणी स्वरूपाची, तडजोडीस पात्र फौजदारी, वैवाहिक, धनादेशाबाबत, मोटार अपघात नुकसानभरपाई आदी प्रकरणे निकाली काढणे शक्य होणार आहे. यासाठी संबंधितांनी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव आर.एस. साळगावकर यांनी केले.
याचा लाभ घेण्यासाठी सर्व पक्षकारांनी प्रलंबित प्रकरणे सामंजस्याने सोडवण्यासह ती निकाली काढून दुरावलेले संबंध पुनर्स्थापित करण्यासाठी या लोकन्यायालयाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
(प्रतिनिधी)