शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पालघरचे भाजपा खासदार राजेंद्र गावित यांना मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2018 09:10 IST

मीरा रोडच्या जोगर्स पार्कमधील रखवालदारास मारहाण करणाऱ्यांपासून वाचवण्यासाठी गेलेले पालघरचे भाजपा खासदार राजेंद्र गावित यांना मारहाण करण्यात आली आहे.

मीरा रोड - मीरा रोडच्या जोगर्स पार्कमधील रखवालदारास मारहाण करणाऱ्यांपासून वाचवण्यासाठी गेलेले पालघरचे भाजपा खासदार राजेंद्र गावित यांना अर्वाच्च शिवीगाळ, दमदाटी करत मारण्यास धावून जाणाऱ्या 5 जणांना नया नगर पोलिसांनी अटक केली आहे. 

मीरा रोड पूर्वेला रेल्वेमार्गालगत पालिकेचे जोगर्स पार्क आहे. गावित हे मीरा रोड येथेच राहायला असून ते रोज सकाळी येथे येत असतात. काल मंगळवारी सकाळी 9च्या सुमारास ते जोगर्स पार्कमध्ये फेरफटका मारत होते. त्यावेळी गवतात बूट घालून चालू नका म्हणून सांगणाऱ्या रखवालदारासोबत 8 ते 9 जण अर्वाच्च शिवीगाळ करत मारत होते. गावित हे रखवालदारास सोडवण्यासाठी मध्ये पडले असता त्या टोळक्याने त्यांनासुद्धा शिवीगाळ करत मारण्यास अंगावर धावून गेले. आपण खासदार असल्याचे सांगून देखील त्यांनी अरेरावी सुरूच ठेवली. गावित यांनी पोलिसांना कळवले असता पोलीस घटनास्थळी धावून आले. 

या प्रकरणी रखवालदाराकडून पोलिसात तक्रार दाखल करण्यात आल्यावर कीर्ती शेट्टी, राजेश विश्वनाथ शेट्टी, नवीन विठ्ठल शेट्टी, सुकेश शेट्टी व शिवराम शेट्टी या पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे. अन्य तीन ते चार आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.  पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक अतिग्रे तपास करत आहेत.

टॅग्स :BJPभाजपा