शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

"उद्धव ठाकरे खूप चांगली व्यक्ती हे मान्य करतो,पण..."; श्रीनिवास वनगांनी सांगितले घर सोडण्याचे कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2024 13:40 IST

दोन दिवसांपासून अज्ञातवासात असलेल्या श्रीनिवास वनगा यांनी अखेर समोर येत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

Shrinivas Vanga :पालघर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी न मिळाल्याने विद्यमान आमदार श्रीनिवास वनगा हे प्रचंड नाराज झाले होते. उद्धव ठाकरे या देवमाणसाची मला आज माफी मागायची आहे. एकनाथ शिंदेंनी दिलेला शब्द पाळायला पाहीजे होता असं म्हणत श्रीनिवास वनगा घरातून निघून गेले होते. त्यांचे कुटुंबीय आणि पोलीस यंत्रणा रात्रीपासून त्यांचा शोध घेत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही वनगा कुटुंबियांशी फोनवरुन संवाद साधला होता. अखेर दोन दिवसांनी श्रीनिवास वनगा हे घरी परतले आहेत. माझ्या बाबतीत चुकीची माहिती एकनाथ शिंदे यांना दिल्याने माझी उमेदवारी कापल्याचे श्रीनिवास वनगा यांनी म्हटलं आहे.

शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार श्रीनिवास वनगा यांना पालघर विधानसभेची उमेदवारी नाकारण्यात आली आहे. उमेदवारी न मिळाल्याने श्रीनिवास वनगा आणि त्यांचे कुटुंबीय मानसिक दृष्ट्या प्रचंड अस्वस्थ झाले आहे. श्रीनिवास वनगा हे कोणाला काहीही न सांगता अज्ञात वाहनातून घरातून निघून गेले होते. त्यानंतर दोन दिवसांपासून नॉट रिचेबल होते. त्यानंतर वनगा हे घरी परतले. यावेळी टीव्ही ९ मराठीशी बोलताना वनगा यांनी प्रामाणिकतेचे राजकारणात काम नाही असं म्हटलं आहे.

"मी कुठेही गेलो नव्हतो. मी माझ्या नातेवाईंकडे जवळपास होतो.  दोन दिवस मी घराच्या आसपासच होतो. माझी सहज अपेक्षा होती की पालघर किंवा डहाणू विधानसभेमध्ये उमेदवारी मिळावी. त्यामुळे सहाजिकच नाराज होणारच आणि त्या भावनेतूनच जे काही बोलायचे ते बोललो. मी ठाकरे गटाच्या संपर्कात नव्हतो. फक्त रागाच्या भरात मी नातेवाईकांकडे निघून गेलो होतो," असं स्पष्टीकरण श्रीनिवास वनगा यांनी दिले.

"सध्या माझी कोणतीही भूमिका नाही. मी शंभूराज देसाईंसोबत बोललो आहे. फक्त एवढीच अपेक्षा होती की माझं तिकीट कापण्यासाठी ज्यांनी षडयंत्र त्यांच्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कारवाई करतील. एकनाथ शिंदे जे सांगतील ते काम मी करेल. हे बळी घेणारे जिल्हाप्रमुख कुंदन संखे, राजेंद्र गावीत आहेत. त्यांच्यावर एकनाथ शिंदे कारवाई करतील याची मला खात्री आहे. प्रामाणिकतेचे राजकारणात काम नाही. त्यामुळे कदाचित मी पुढचा विचार मी करेन. माझ्या कुटुंबासाठी मला जगायचं आहे, असं श्रीनिवास वनगा म्हणाले.

"माझा घात एकनाथ शिंदे यांनी नाही तर त्यांना चुकीची माहिती देणाऱ्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी केला. त्यांनी माझ्याबद्दल चुकीचा माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिली. आजपर्यंत आमचं घराणं महायुतीमध्ये आहे. त्यामुळे आम्ही अजूनही कोणत्याही पक्षाचे काम करु शकत नाही. भाजप आणि शिवसेनेशिवाय मी कोणाचे काम करणार नाही," असं स्पष्टीकरण वनगा यांनी दिलं.

"आतातरी माझी उद्धव ठाकरेंना भेटण्याची इच्छा नाही. उद्धव ठाकरे हे खूप चांगले व्यक्ती आहेत हे मान्य करतो. पण सध्या मी त्यांच्याकडे जाण्याच्या मानसिकतेमध्ये नाही. एकनाथ शिंदेंसोबत जाण्याचा निर्णय चुकला नव्हता. कारण अडीच वर्षांमध्ये काहीच काम होत नव्हतं. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मी १२०० कोटींचा निधी मतदारसंघात आणला आहे," असंही श्रीनिवास वनगा यांनी म्हटलं. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४palghar-acपालघरEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरे