पालघर - ठाणे जिल्ह्यांत २७ हजार एचआयव्हीबाधित
By Admin | Updated: September 14, 2015 23:09 IST2015-09-14T23:09:10+5:302015-09-14T23:09:10+5:30
ठाणे आणि पालघर जिल्ह्यांत २७ हजार एचआयव्हीबाधित रुग्ण आहेत. या जीवघेण्या रोगातून बाहेर पडण्यासाठी जनजागृती महत्त्वाची असून एचआयव्हीबाधित व्यक्तीने संकोच

पालघर - ठाणे जिल्ह्यांत २७ हजार एचआयव्हीबाधित
ठाणे : ठाणे आणि पालघर जिल्ह्यांत २७ हजार एचआयव्हीबाधित रुग्ण आहेत. या जीवघेण्या रोगातून बाहेर पडण्यासाठी जनजागृती महत्त्वाची असून एचआयव्हीबाधित व्यक्तीने संकोच न बाळगता इलाज करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, यासाठी दोन्ही जिल्ह्यांत एक पथदर्शी प्रकल्प हाती घेणे आवश्यक असल्याचे मत आयईसीचे सहसंचालक डॉ. विलास देशपांडे यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटीच्या वतीने हॉटेल सत्कारमध्ये दोन दिवसांची कार्यशाळा आयोजित केली होती. तिचे उद्घाटन करताना ते बोलत होते.
राज्यात अनेक ठिकाणी अशा कार्यशाळांचे आयोजन करण्याचा सोसायटीचा मानस आहे. या प्रकल्पामध्ये जिल्ह्यातील सर्व महापालिका, नगरपालिका, जिल्हापरिषद आदी क्षेत्रांतील आरोग्य यंत्रणांनी सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले. या वेळी नॅकोचे डॉ. राजेश राणा यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.