पेट्रोलपंपावर ग्राहकांची वाटमारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 00:39 IST2017-07-31T00:39:44+5:302017-07-31T00:39:44+5:30

कल्याणच्या पश्चिमेला स्टेशनजवळच्या पेट्रोल पंपावर दिवसाढवळ््या वाटमारी सुरू असून ग्राहकांना पैशाच्या बदल्यात कमी पेट्रोल दिले जात असल्याची ओरड सुरू आहे.

paetaraolapanpaavara-garaahakaancai-vaatamaarai | पेट्रोलपंपावर ग्राहकांची वाटमारी

पेट्रोलपंपावर ग्राहकांची वाटमारी

कल्याण : कल्याणच्या पश्चिमेला स्टेशनजवळच्या पेट्रोल पंपावर दिवसाढवळ््या वाटमारी सुरू असून ग्राहकांना पैशाच्या बदल्यात कमी पेट्रोल दिले जात असल्याची ओरड सुरू आहे. एखाद्याच्या लक्षात हा प्रकार आलाच, तर दिलगिरी व्यक्त करून प्रकरण मिटवले जाते. पण लाखो लीटर पेट्रोल-डिझेलच्या बदल्यात सुरू असलेली लूटही तेवढ्याच रकमेची असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे.
आधीच चिप टाकून पंपावरून कमी पेट्रोल-डिझेल देत सुरू असलेल्या लुटीचे प्रकरण चर्चेत असतानाच ही नवी लूटमार ग्राहकांची पिळवणूक करणारी ठरते आहे. 
खडकपाडा येथे राहणाºया नागरिकाला हा अनुभव आला. ते नेहमी ज्या पंपावरून पेट्रोल भरतात, तेथे वारंवार पन्नास पैसे-रूपयाचे पेट्रोल कमी दिले जात असल्याचे त्यांच्या लक्षात आले. पुरेशी रक्कम दिल्यानंतरही हा प्रकार होत असल्याने त्यांनी पेट्रोल भरणाºयाकडे विचारणा केली असता त्याने त्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे त्यांनी थेट पंपाचे आॅफिस गाठले. पण पंपचालकाचा पत्ता नव्हता. एक कर्मचारी आला. त्याने दिलगिरी व्यक्त करत प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न सुरू केला. एक ग्राहक तक्रार करीत असल्याचे पाहून दहा-बारा इतर ग्राहकही तेथे जमले आणि त्यांनीही रकमेपेक्षा पेट्रोल कमी भरल्याची ओरड सुरू केली. ही वाटमारी लक्षात आल्याने आपले बिंग फुटेल या भीतीने ग्राहकांनी पोलीस ठाण्यात जाऊ नये, यासाठी तेथील कर्मचाºयाने मिनतवाºया सुरू केल्या. 
या पंपावर इलेक्ट्रानिक मशीन आहे. त्यावर रक्कम सेट केली की तेवढे पेट्रोल येते. पण तशी रक्कम सेट केलीच जात नाही. कर्मचारी अंदाजाने पेट्रोल भरत जातात. प्रत्येक ग्राहकामागे जर ४० पैशांपासून रूपयापर्यंत कमी पेट्रोल दिले जात असेल तर त्यातून रोजच्या लुटीची कल्पना यावी. त्यातून महिन्याचा व वर्षाच्या लुटीचा आकडा थक्क करणारा आहे. या पंपावरील हा अनुभर रोजचाच आणि गेल्या काही महिन्यांचा आहे. 

Web Title: paetaraolapanpaavara-garaahakaancai-vaatamaarai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.