पार्ट्या करण्यासाठी येणाऱ्यांना पाेलिसांचा चाेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:45 IST2021-05-25T04:45:42+5:302021-05-25T04:45:42+5:30
भातसानगर : शहापूर तालुक्यातील भातसा धरणाच्या नदीपात्रामध्ये पार्ट्या करून धिंगाणा घालणाऱ्यांना रविवारी पोलिसांनी चांगलाच चोप दिला. दोन वर्षांपासून ...

पार्ट्या करण्यासाठी येणाऱ्यांना पाेलिसांचा चाेप
भातसानगर : शहापूर तालुक्यातील भातसा धरणाच्या नदीपात्रामध्ये पार्ट्या करून धिंगाणा घालणाऱ्यांना रविवारी पोलिसांनी चांगलाच चोप दिला. दोन वर्षांपासून कोरोनाची महामारी असतानाही या धरणाच्या खाली नदीपात्रात ठाणे जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर लोक पार्ट्या करण्यासाठी येत होते. सजिवली, सावरशेत येथील ग्रामस्थ, खासकरून महिलांना त्रास सहन करावा लागत हाेता. अखेर या कारवाईमुळे या प्रकारांना आळा बसेल, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
दारू पिऊन काचेच्या बाटल्या तेथेच फाेडणे, त्याच्या काचा पाण्यात टाकणे असे प्रकार घडत हाेते. यासंदर्भात ग्रामपंचायतीतर्फेही तक्रार करण्यात आली होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. ‘लाेकमत’मधून अनेकदा बातम्या प्रसिद्ध करून या गैरप्रकारांकडे लक्ष वेधण्यात आले हाेते. साजिवली गावातील ग्रामपंचायत सदस्या नीता शिरोसे व त्यांचे पती तुकाराम शिरोसे यांनी भातसानगरमधील अधिकाऱ्यांशी संपर्क साधून या बेशिस्त नागरिकांना अद्दल घडवावी, अशी मागणी केली. अधिकाऱ्यांनी त्वरित शहापूर पाेलिसांशी संपर्क साधून या प्रकाराबाबत तक्रार केली. पाेलिसांनी रविवारी सायंकाळी या पार्ट्या करणाऱ्या व्यक्तींना चांगलाच चाेप देऊन पिटाळून लावले. या कारवाईनंतर ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.