शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला? शांतीगिरी महाराजांच्या अर्जावर शिंदे शिवसेना असा उल्लेख, अर्ज भरला
2
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
3
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
4
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
5
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
6
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
7
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
8
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
9
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
10
“ते म्हणजे महाराष्ट्र या मानसिकतेतून ठाकरेंनी बाहेर यावे”; देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
11
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
12
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
13
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
14
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
15
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ
16
Fact Check : पंजाबमध्ये भाजपाच्या विरोधात लोकांनी झेंडे जाळल्याचा Video दिशाभूल करणारा; हे आहे 'सत्य'
17
नोकरीच्या शोधात फिरणारी युवती अचानक बनली कोट्यधीश; ८ वर्षापूर्वी नेमकं काय घडलं?
18
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
19
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
20
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार

आमचे खायचे आणि दाखविण्याचे दात एकच - आदीत्य ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2019 4:56 PM

भाजपाचा नमोउल्लेख टाळत बुधवारी शिवसेनेचे युवा सेना प्रमुख आदीत्य ठाकरे यांनी टिका केली आहे. त्यामुळे युतीबाबत अद्यापही काही खरे नाही, असेच काहीसे त्यांच्या बोलण्यावरुन स्पष्ट झाले आहे.

ठळक मुद्देदंत चिकीत्सा मोहीम सुरुसभागृह नेत्यांनी केली पालिका अधिकाऱ्याची कान उघाडणी

ठाणे - आमचे खायचे आणि दाखविण्याचे दात एकच असल्याचे सांगत शिवसेनेचे युवा सेना प्रमुख आदीत्य ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे भाजपाला टोला लगावला. ठाणे महापालिकेच्या वतीने आयोजित दंत चिकित्सा शिबीराच्या उदघाटनाच्या निमित्ताने आदित्य ठाकरे बुधवारी ठाण्यात आले होते                आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर निवडणूक तज्ञ प्रशांत किशोर यांनी मंगळवारी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. या पार्शवभूमीवर ठाण्यात आदीत्य ठाकरे आले असता पत्रकारांनी त्यांना या भेटीबाबत विचारले असता त्यांनी भाजपचे नाव न घेता टीका केली. परंतु इतर प्रश्नांवर बोलणे त्यांनी टाळले. ठाणे पालिकेच्या वतीने आयोजित दंत चिकित्सा शिबीर निमित्त ते ठाण्यात आले होते. या वेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद देखील साधला. पालिका शिक्षण विभाग आणि हेल्दी स्माईल या संस्थेच्या सहकार्याने पालिकेच्या सर्व शाळांमधील १ ली ते ५ वीच्या सुमारे १३ हजार विद्यार्थ्यांसाटी दंत चिकित्साशिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना ते म्हणाले मुंबईतही असे उपक्र म राबविण्यात आले आहेत. आता ठाण्यात त्याची सुरवात झाली असून लहान मुलाच्या दातांची निगा राखण्यासाठी अशा उपक्र मांची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.चौकट - सभागृह नेते आणि पालिका अधिकारी यांच्यात झाला वादवर्तक नगर येथील महापालिकेच्या शाळेत या उपक्रमाची सुरवात करण्यात आली. परंतु यावेळी शाळेच्या आवारातच पालिकेच्या माध्यमातून सोलार पॅनल उभारण्यात येत आहे. परंतु त्याबाबत तक्रारी करुनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी पालिका अधिकारी मनीष जोशी यांची चांगलीच कान उघाडणी यावेळी केली. 

टॅग्स :thaneठाणेShiv SenaशिवसेनाAditya Thackreyआदित्य ठाकरे