शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

मराठी पाट्या न लावल्यास खळ्ळखट्याकची भाषा वापरु - ठाण्यातील मनसे पदाधिकाºयांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 17:08 IST

दुकानाबाहेर मराठी पाट्या न दिसल्यास पुन्हा एकदा खळ्ळखट्याकची भाषा वापरली जाईल असा इशारा ठाण्यातील मनसे पदाधिकाºयांनी दिला आहे.

ठळक मुद्देशहरातील दुकानदारांना मराठी पाट्या लावण्याचे पत्रठाणे पोलिसांच्या मनसे पदाधिकाऱ्यांना नोटिसा कामगार आयुक्तांना घेराव घातला जाईल - अविनाश जाधव

ठाणे: ठाण्यातील मनसे पदाधिकाºयांनी शहरातील दुकानदारांना मराठी पाट्या लावण्याचे पत्र आणि त्यात १५ दिवसांची मुदत दिली आहे. मराठी पाट्यांसाठी मनसे पदाधिकाºयांकडून हिंसक आंदोलन होईल या भितीने ठाणे पोलीसांनी त्यांना नोटीसा बजावल्या आहेत. परंतू दिलेल्या मुदतीत मराठी पाट्या न लावल्यास मनसे पोलीसांच्या नोटीसांना नेहमीप्रमाणे न जुमानता पुन्हा एकदा खळ्ळखट्याक होणार इशारा ठाणे मनसेने दिला आहे.      १५ दिवसांपुर्वी ठाण्यात झालेल्या जाहीर सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा दुकानांवरील मराठी पाट्यांसाठी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. त्यानंतर मनसे पदाधिकारी - कार्यकर्त्यांनी दुकानाबाहेर मराठी पाट्या लावण्याचे पत्र दिले. ठाण्यात मनसे पदाधिकाºयांनी शहरातील ५०० दुकानदारांना पत्र दिले आणि १५ दिवसांची मुदत देण्यात आली. एल्फिस्टन येथे झालेल्या दुर्घटनेनंतर मनसेने स्टेशन परिसरातील फेरीवाल्यांविरोधात आक्रमक आंदोलन केले. याच पार्श्वभूमीवर मनसे पदाधिकाºयांनी दुकानदारांना मराठी पाट्या लावण्याचे पत्र दिल्यानंतर त्यांच्याकडून आंदोलन करण्याची भिती पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे. यासाठी पोलिसांनी मनसेच्या २५ जणांना नोटिसा दिल्या आहेत. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशी आंदोलने करू नयेत, असे त्यात बजावण्यात आले असून त्याचे उल्लंघन झाल्यास कठोर कारवाईचा इशाराही त्यात देण्यात आला आहे. परंतू नेहमीप्रमाणे मनसे पोलीसांच्या नोटीशींना जुमानणार नाही. १५ दिवसांत दुकानाबाहेर मराठी पाट्या न दिसल्यास खळ्खट्याकची भाषा वापरण्यात येईल. त्या आधी कामगार आयुक्तांना घेराव घातला जाईल असा इशारा ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिला आहे.

टॅग्स :thaneठाणेMNSमनसेPoliticsराजकारण