लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: लोकमत वृत्तपत्र समुहाने स्व. जवाहरलाल दर्डा बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त राज्यभर रक्ताचे नाते उपक्रमांतर्गत रक्तदान शिबीर राबविले. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून या उपक्रमातून इतरांनीही बोध घ्यावा, रक्तदानासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन हास्यजत्रा फेम सुप्रसिद्ध अभिनेते समीर चौगुले यांनी केले. तर हा स्तुत्य उपक्रम प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन अभिनेत्री सोनाली पाटील हिने रविवारी ठाण्यातील वर्तकनगर येथील रक्तदान शिबिरामध्ये केले.लोकमत, ठाणे शहर काँग्रेस आणि श्री अय्यपा भक्त सेवा संघम, वर्तकनगर यांच्या संयुक्त विद्यमाने श्री अय्यपा भक्त सेवा संघमच्या सभागृहात रविवारी सकाळी १०.३० ते सायंकाळी ४.३० या दरम्यान रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिराचे उद्घाटन अभिनेते समीर चौघुले यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले,
लोकमतच्या रक्तदानाच्या उपक्रमातून इतरांनीही बोध घ्यावा: समीर चौगुले
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2021 00:48 IST
रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून या उपक्रमातून इतरांनीही बोध घ्यावा, रक्तदानासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन हास्यजत्रा फेम सुप्रसिद्ध अभिनेते समीर चौगुले यांनी केले. तर हा स्तुत्य उपक्रम प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन अभिनेत्री सोनाली पाटील हिने रविवारी ठाण्यातील वर्तकनगर येथील रक्तदान शिबिरामध्ये केले. यावेळी ७७ दात्यांनी रक्तदान केले.
लोकमतच्या रक्तदानाच्या उपक्रमातून इतरांनीही बोध घ्यावा: समीर चौगुले
ठळक मुद्देठाण्यात वर्तकनगर येथे ७७ दात्यांचे रक्तदानस्तुत्य उपक्रम- सोनाली पाटील