शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

उस्मानाबाद ते युरेका फोर्ब्स व्हाया सिग्नल शाळा; गजरे विकून 'त्याने' गाठलं यशाचं शिखर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2020 06:49 IST

ठाण्याने मला अनुभव, माणसं, ओळख दिली; मोहन काळेची यशोगाथा 

स्रेहा पावसकरठाणे : घरची परिस्थिती खूपच हलाखीची असल्यामुळे त्याकाळी पोट भरण्यासाठी उस्मानाबाद येथून घरातून पळून मी ठाणे गाठले होते. अभ्यास, उच्च कंपनीत नोकरी हे तर कुठेही ध्यानीमनी नव्हतं, पण ज्या सिग्नलवर काहीतरी विकून पोट भरत होतो, दिवस ढकलत होतो, त्याच सिग्नलवरील शाळेतून घेतलेल्या शिक्षणामुळे मी आज मोठ्या कंपनीत रुजू झालो आहे. खिशात एक पैसा नसतानाही ज्या शहरात आलो, त्या ठाणे-मुंबईने मला खूप काही दिलं. पोट तर भरलंच पण अनुभव दिला, चांगली माणसं दिली आणि आज स्वत:च्या पायावर उभं करून एक ओळखही दिली, असे कृतज्ञ आणि भावुक उद्गार आहेत, ते सिग्नल शाळेतून शिक्षण घेऊन युरेका फोर्ब्ससारख्या कंपनीत नोकरी मिळवणाऱ्या मोहन प्रभू काळे याचे.

ठाणे महापालिका आणि समर्थ भारत व्यासपीठातर्फे पाच वर्षांपूर्वी तीनहातनाक्यावर सिग्नल शाळा सुरू झाली. त्यातून पहिल्यांदा दहावीची परीक्षा देऊन उत्तीर्ण झालेल्यांपैकी एक म्हणजे मोहन काळे. २०१३-१४ साली गावावरून एकटा पळून आल्यावर सुरुवातीला ठाण्यात त्याने बिगारीकाम केले. नंतर, तो सिग्नलवर छोट्यामोठ्या वस्तू विकू लागला. नंतर आईवडील आणि दोन भावांसह तो सिग्नलवरच राहू लागला. शिकण्याची इच्छा होती, पण परिस्थितीपुढे हतबल असल्याने त्याने शिक्षण अर्धवट सोडले होते. सिग्नल शाळेतून त्याला शिकण्याची पुन्हा एक संधी मिळाली. गजरे विकून अभ्यास केला. दहावीत ७२ टक्के गुण मिळाल्यावर तत्कालीन ठामपा आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या सहकार्याने रुस्तमजी ग्लोबल करिअर इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश मिळाला. तेथे डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिकल इंजिनीअरिंगचे शिक्षण पूर्ण केले. परंतु, इंग्रजीचा अभाव, हातात पुरेसे पैसे नसणे, नोकरी मिळवण्याबाबत फारशी कल्पना नसल्याने आपला हा डिप्लोमा करण्याचा निर्णय चुकला की काय, असे त्याला सारखे वाटत होते. मात्र, तरीही मेहनत करून त्याने इंग्रजी शिकून कॅम्पस मुलाखत दिली आणि त्याची युरेका फोर्ब्स कंपनीत निवड झाली. त्याचे कुटुंब पुन्हा गावी राहत असून तो बालस्रेहालय संस्थेच्या वसतिगृहात राहत आहे.छोटं घर घेण्याचे स्वप्ननोकरी मिळाल्याचे अजून आईवडिलांना सांगितलेले नाही. आता ते थकलेले असून वडील अपंग असल्याने त्यांचा मीच आधार आहे. त्यामुळे नोकरी करून ठाण्यात छोटं घर घेण्याचे स्वप्न असून त्यांना इथेच राहायला आणण्याचा विचार आहे. तसेच नोकरी करताकरता मास्टर्स पदवीही घ्यायची आहे, असे मोहनने ‘लोकमत’ला सांगितले.

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी