शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
3
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
4
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
5
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
6
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
7
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
8
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
9
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

भिवंडीत विनापरवाना फाइट क्लबचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 12:22 AM

धक्कादायक बाब म्हणजे, कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू असताना, या ठिकाणी कोणत्याही नियमांचे पालन कोणीही करताना दिसले नाही. या ठिकाणी कोणाच्याही चेहऱ्यावर मास्क नव्हता, तसेच येथे सोशल डिस्टसिंगचा पुरता फज्जा उडाला होता.

भिवंडी : शहरातील शांतीनगर पोलीस स्टेशन अंतर्गत पिराणी पाडा परिसरात असलेल्या यहीया कंपाउंड येथे रविवारी रात्री कोरोनामुळे लागू केलेले सर्व निर्बंध धाब्यावर बसवून विनापरवानगी भिवंडी फाइट क्लबचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे पोलिसांनी आयोजकांवर गुन्हा दाखल केला.या खेळात दोन फायटर एका रिंगमध्ये प्रवेश करून फाइट करतात. ही फाइट पाहण्यासाठी स्थानिक नागरिकांनी एकच गर्दी केली होती. धक्कादायक बाब म्हणजे, कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू असताना, या ठिकाणी कोणत्याही नियमांचे पालन कोणीही करताना दिसले नाही. या ठिकाणी कोणाच्याही चेहऱ्यावर मास्क नव्हता, तसेच येथे सोशल डिस्टसिंगचा पुरता फज्जा उडाला होता. आयोजकांनी या फाइट सामन्यांसाठी कोणतीही परवानगी घेतली नसताना, यूट्यूबच्या माध्यमातून या सामन्यांचे लाइव्ह प्रक्षेपण सुरू होते. ही बाब पोलिसांना कळताच ते घटनास्थळी दाखल झाले. या फाइट क्लबचे आयोजक सलमान अब्दुल कयुम याच्या विरोधात शांतीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, या फाइट क्लबचे उद्घाटन रविवारी सायंकाळी भिवंडी पश्चिमचे भाजप आ. महेश चौगुले यांच्या हस्ते झाले होते. खुद्द आ. चौघुले यांच्या मुलाने या फाइट स्पर्धेत भाग घेत विजय मिळविला आहे. चौगुले यांच्या पुत्राने फाइट सुरू असताना डोक्यावर सेफ्टी हेल्मेट घातले नव्हते व सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही खबरदारीही घेण्यात आली नव्हती. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू असताना या ठिकाणी कुणाच्याच चेहऱ्यावर मास्क नव्हता, तसेच सोशल डिस्टन्सिंगचे यावेळी पार तीनतेरा वाजले होते.