शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातील दहा सहायक पोलीस आयुक्तांच्या बदल्यांचे आदेश

By जितेंद्र कालेकर | Updated: October 16, 2020 19:41 IST

गेली अनेक दिवस कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रखडलेल्या पोलीस उपअधीक्षक तसेच सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या बदल्याचे आदेश गृहविभागाने १ आॅक्टोबर रोजी काढले होते. आता ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील दहा सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या बदल्यांचे आदेश पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी काढले आहेत.

ठळक मुद्देप्रकाश निलेवाड विशेष शाखेतबजबळे यांची वागळे इस्टेटमध्ये बदली

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील दहा सहायक पोलीस आयुक्तांच्या बदल्यांचे आदेश पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी काढले आहेत. वागळे इस्टेट विभागाचे सहायक आयुक्त प्रकाश निलेवाड आणि डोंबिवलीचे जयराम मोरे आदींचा यामध्ये समावेश आहे.गेली अनेक दिवस कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रखडलेल्या पोलीस उपअधीक्षक तसेच सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या बदल्याचे आदेश गृहविभागाने १ आॅक्टोबर रोजी काढले होते. तब्बल १०५ अधिकाऱ्यांपैकी ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाला सहा सहाय्यक आयुक्तांची तर ठाणे ग्रामीणसाठी दोन आणि पालघर जिल्हयासाठी एका उपअधीक्षकाच्या नियुक्तीचे आदेश राज्याच्या गृहविभागामार्फत काढण्यात आले. ठाणे शहर मधील चार तसेच इतर अशा दहा सहायक आयुक्तांना नियुक्तीचे आदेश पोलीस आयुक्त फणसळकर यांनी काढले आहेत. वागळे इस्टेट विभागाचे निलेवाड यांना आता विशेष शाखा-१ मध्ये आणण्यात आले आहे. तर विशेष शाखेचे बजबळे यांना वागळे इस्टेट विभागात संधी मिळाली आहे. प्रशासन विभागातील दत्ता तोटेवाड यांची उल्हासनगरच्या वाहतूक शाखेत बदली झाली आहे. मुख्यालयातील उमेश पाटील यांनाही कल्याणच्या वाहतूक शाखेत नियुक्ती मिळाली. सध्या मुख्यालय एकचा अतिरिक्त कार्यभार सांभाळणारे जयराम मोरे यांचीही पुन्हा डोंबिवली विभागात बदली करण्यात आली आहे.त्याचबरोबर ठाणे जात पडताळणी विभागाच्या उपअधीक्षक संगीता अल्फान्सो यांना ठाणे शहर नियंत्रण कक्षात नियुक्ती मिळाली आहे.तर डहाणू येथून आलेल्या मंदार धर्माधिकारी यांनाही मुख्यालय -२ मध्ये नियुक्ती देण्यात आली आहे. गोंदियाचे उपअधीक्षक प्रशांत ढोले यांना भिवंडी पूर्व, तर सोनाली ढोले यांना प्रशासन विभागात नियुक्ती देण्यात आली आहे. औरंगाबादच्या कन्नड येथून आलेल्या जगदीश सातव यांना मुख्यालय -१ च्या सहायक आयुक्त पदी नियुक्ती दिल्याचे आदेशात म्हटले आहे.

 

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिसTransferबदली