शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व दुचाकी चालक अधिकारी - कर्मचाऱ्यांना हेल्मेट सक्ती

By सुरेश लोखंडे | Updated: January 14, 2019 15:37 IST

उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालय यांनी देखील दुचाकी वाहन चालवताना हेल्मेट घालणे सक्तीचे असल्याचे वेळोवेळी निर्णय दिलेले आहेत. जिल्ह्यात केंद्र शासनाच्या रस्ता सुरक्षा सप्ताहसह राज्य रस्ता सुरक्षा पंधरवडा देखील साजरा होता. मात्र तरी देखील जिल्ह्यात रस्त्यावरील अपघाती मृत्यूच्या प्रमाणात दिवसन दिवस वाढ होताना दिसून येत आहे. त्यात घट करण्यासाठी जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हा रस्ता सुरक्षा समिती अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील दुचाकी वाहन चालक सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना हेल्मेट घालण्याची सक्ती करणारा आदेश जारी केला आहे.

ठळक मुद्दे रस्ते अपघातातील घटनेत मृत्यूच्या प्रमाणात दिवसन दिवस वाढ सर्व कर्मचाऱ्यांना हेल्मेट वापरण्याची सक्ती करणारे आदेशरस्ता सुरक्षा सप्ताहसह राज्य रस्ता सुरक्षा पंधरवडा देखील साजरा होता. मात्र तरी देखील जिल्ह्यात रस्त्यावरील अपघाती मृत्यूच्या प्रमाणात दिवसन दिवस वाढ

ठाणे : रस्ते अपघातातील घटनेत मृत्यूच्या प्रमाणात दिवसन दिवस वाढ झालेली दिसून येत आहे. या आळा घालून अपघाती मृत्यू टाळण्यासाठी जिल्ह्यातील सरकारी, निमसरकारी विविध विभागात कार्यरत असलेल्या व दुचाकी चालवणाऱ्यां  सर्व कर्मचाऱ्यांना हेल्मेट वापरण्याची सक्ती करणारे आदेश ठाणेजिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी जारी केले आहेत. यामुळे मनमानी दुचाकी चालवणाऱ्यां  कर्मचाऱ्यांचे आता धाबे दणाणले आहे.जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय, महामंडळे, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद, सर्व शाळां, कॉलेज व सर्व शासकीय यंत्रणांच्या कार्यालयात काम करणारे अधिकारी, कर्मचारी जे दुचाकी वाहनाचा वापर करतात त्यांना मोटर वाहन अधिनियम अन्वये हेल्मेट घालणे सक्तीचे करणारा आदेश ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी आता जारी केला आहे. त्यांनी हेल्मेट वापरण्याचा आदेश ९ जानेवारीपासून जिल्ह्यात लागू केला आहे. या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कार्यालयात येताना अथवा कोणत्याही कामासाठी दुचाकी वाहन वापरताना हेल्मेट घातलेले नसल्यास तो अधिकारी व कर्मचारी हा मोटर वाहन अधिनियम १९८८ मधील तरतुदीनुसार शिक्षेस पात्र ठरविण्यात येणार आहे. याशिवाय मोटर वाहन अधिनियमाचे उल्लघन केल्यास त्यांची गंभीर नोंद घेण्यात येईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशात नमुद केले आहे.उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालय यांनी देखील दुचाकी वाहन चालवताना हेल्मेट घालणे सक्तीचे असल्याचे वेळोवेळी निर्णय दिलेले आहेत. जिल्ह्यात केंद्र शासनाच्या रस्ता सुरक्षा सप्ताहसह राज्य रस्ता सुरक्षा पंधरवडा देखील साजरा होता. मात्र तरी देखील जिल्ह्यात रस्त्यावरील अपघाती मृत्यूच्या प्रमाणात दिवसन दिवस वाढ होताना दिसून येत आहे. त्यात घट करण्यासाठी जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हा रस्ता सुरक्षा समिती अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील दुचाकी वाहन चालक सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना हेल्मेट घालण्याची सक्ती करणारा आदेश जारी केला आहे. यामुळे रस्त्यावरील अपघाती मृत्युच्या प्रमाणात दिवसन दिवस होत असलेली वाढ कमी होईल आणि जिल्ह्यातील अपघातात घट होण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे.

 

टॅग्स :thaneठाणेcollectorजिल्हाधिकारीOrder orderआदेश केणे