शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

एसटी कामगारांना कामावर रुजू होण्याचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2021 07:51 IST

ठाणे विभागीय कार्यालयाकडून १४० कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहण्यासंदर्भातील नोटिसा बजावल्याची माहितीही एसटीचे ठाणे विभागीय नियंत्रक विनोदकुमार भालेराव यांनी शनिवारी दिली. 

ठाणे : मागील काही दिवसांपासून विविध मागण्यांसाठी ठाणे विभागीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या आठ आगारांतील कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. या संपाची तीव्रता असतानाच कामगार न्यायालयाने सर्व कामगारांना कामावर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. दुसरीकडे ठाणे विभागीय कार्यालयाकडून १४० कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहण्यासंदर्भातील नोटिसा बजावल्याची माहितीही एसटीचे ठाणे विभागीय नियंत्रक विनोदकुमार भालेराव यांनी शनिवारी दिली. शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांनाही २८ टक्के महागाई भत्त्याचा दर लागू करावा, वार्षिक वेतनवाढ २ वरून ३ टक्के मान्य केलेल्या तारखेपासून लागू करावी, तसेच सातव्या वेतन आयोगानुसार केंद्र व राज्य शासनाने लागू केलेला घरभाडे भत्ता सुधारित दराने लागू करावा, या कृती समितीच्या मागण्या दिवाळीपूर्वीच प्रशासनाने मान्य केलेल्या आहेत. परंतु कर्मचारी हे विलीनीकरणाच्या मुद्द्यावर ठाम असून  गेले काही दिवसांपासून संपावर आहेत. ठाणे जिल्ह्यातील आठ आगारांतील सुमारे दोन हजार ७०० कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत. या संपामुळे एसटी महामंडळाचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. त्यातच आता कामगार न्यायालयाने सर्व कामगारांना कामावर हजर राहण्याचे आदेश दिल्याने कर्मचाऱ्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष आहे.

टॅग्स :state transportएसटी