इंदिरा गांधी रूग्णालयाच्या कर्मचा-यांना वेतन देण्याचा आदेश

By Admin | Updated: March 11, 2015 00:09 IST2015-03-11T00:09:09+5:302015-03-11T00:09:09+5:30

स्व. इंदिरागांधी स्मृती रूग्णालयात मनपाच्या आरोग्य सेवेतील ४४ कर्मचाऱ्यांचे वेतन येत्या आठ दिवसांत देण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य शासनास दिले आहे.

Order to pay staff to Indira Gandhi hospital staff | इंदिरा गांधी रूग्णालयाच्या कर्मचा-यांना वेतन देण्याचा आदेश

इंदिरा गांधी रूग्णालयाच्या कर्मचा-यांना वेतन देण्याचा आदेश

भिवंडी : स्व. इंदिरागांधी स्मृती रूग्णालयात मनपाच्या आरोग्य सेवेतील ४४ कर्मचाऱ्यांचे वेतन येत्या आठ दिवसांत देण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य शासनास दिले आहे.
तीन वर्षापासून या कर्मचाऱ्यांचे वेतन महापालिकेकडून दिले जात होते. मात्र या ४४ कर्मचाऱ्यांचे समावेशन शासकीय आस्थापनात केले जात नव्हते. त्यामुळे दर सहा महिन्यांनी या कर्मचाऱ्यांना वेतनासाठी आंदोलन करावे लागत होते. याबाबत न्याय मागण्यासाठी कर्मचाऱ्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यानुसार न्या. नरेश पाटील व न्या. अजय गडकरी यांच्या खंडपिठाने जुलै २०१४ पासून ते जानेवारी २०१५ पर्यंतचे वेतन राज्य शासनाने अदा करावे, असे आदेश दिल्याने कर्मचाऱ्यांत आनंद आहे.

Web Title: Order to pay staff to Indira Gandhi hospital staff

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.