भाजपाशी युतीस शिवसैनिकांचा विरोध

By Admin | Updated: April 24, 2017 23:59 IST2017-04-24T23:59:30+5:302017-04-24T23:59:30+5:30

भिवंडी महापालिका निवडणुकीत युतीसाठी भाजपाकडून प्रस्ताव आल्याची माहिती शिवसेना शहरप्रमुख सुभाष माने यांनी पक्ष

Opposition to the Shiv Sena with BJP | भाजपाशी युतीस शिवसैनिकांचा विरोध

भाजपाशी युतीस शिवसैनिकांचा विरोध

अनगाव : भिवंडी महापालिका निवडणुकीत युतीसाठी भाजपाकडून प्रस्ताव आल्याची माहिती शिवसेना शहरप्रमुख सुभाष माने यांनी पक्ष कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीत दिली. मात्र, भाजपाशी कोणत्याही परिस्थितीत युती करू नये, युती केल्यास शिवसेनेलाच फटका बसेल, असा सूर असंख्य शाखाप्रमुख आणि विभागप्रमुखांनी आळवला. यामुळे युतीचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील, असे माने यांनी या वेळी स्पष्ट केले.
या आढावा बैठकीस आमदार रूपेश म्हात्रे, शांताराम मोरेंसह ग्रामीण जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, संपर्कप्रमुख सुरेश म्हात्रे, महापौर तुषार चौधरी, दिलीप गुळवी, मनोज काटेकर, मनीषा दांडेकर, उपशहरप्रमुख मनोज गंगे, सचिव दिलीप नाईक, मनोज गुळवी, गोरखनाथ म्हात्रे व नगरसेवक पदाधिकारी उपस्थित होते. निवडणुकीसाठी शिवसेनेकडून इच्छुक उमेदवारांची संख्या मोठी आहे. ज्यांना पक्ष उमेदवारी जाहीर करेल, त्यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना विजयी करा. यात पक्षविरोधात काम करणाऱ्यांची दखल घेतली जाईल, असे आमदार म्हात्रे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Opposition to the Shiv Sena with BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.