शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

मीरा भाईंदरमधील खड्डयांविरोधात विरोधी पक्षाची एकजूट, ६ तारखेपर्यंत खड्डे भरा अन्यथा ७ रोजी बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2025 15:10 IST

मीरा भाईंदर शहरातील रस्ते हे सत्ताधारी आणि प्रशासनाच्या भ्रष्ट व भोंगळ कारभारामुळे खड्ड्यात गेले असून लोकांचे जीव जात आहेत.

मीरारोड - मीरा भाईंदर शहरातील रस्ते हे सत्ताधारी आणि प्रशासनाच्या भ्रष्ट व भोंगळ कारभारामुळे खड्ड्यात गेले असून लोकांचे जीव जात आहेत. तरी देखील त्यांना खड्डे भरणे व खड्डे भरताना ते टिकाऊ चांगल्या दर्जाचे असावेत याचे सोयर सुतक नसल्याचा आरोप करत ६ ऑगस्टपर्यंत सर खड्डे भरले नाहीत  तर ७ रोजी मीरा भाईंदर बंद करणार असल्याचा इशारा काँग्रेस, ठाकरे सेना, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांनी संयुक्तपणे दिला आहे. 

काँग्रेस, ठाकरे सेना, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांनी भाईंदरच्या गोल्डन नेस्ट येथे एकत्र येऊन शहरातील खड्ड्यांवरून बंदचा इशारा दिला आहे. या बाबत पोलीस आयुक्तांना निवेदन दिले असल्याचे सांगत सत्ताधारी भाजपा, शिवसेना आणि महापालिका, एमएमआरडीए, केंद्र सरकारचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण वर टीकेची झोड उठवली. 

मनसेचे शहर अध्यक्ष संदीप राणे म्हणाले कि, भ्रष्ट अधिकारी  व आमदारांचे हात बरबटलेले आहेत. निकृष्ठ दर्जाची कामे करून खिसे भरण्याचे काम सुरु आहे. यांना स्वच्छतेचा नाही तर नाकर्तेपणाचा पुरस्कार दिला पाहिजे. खड्डे बुजले नाहीत तर तीव्र आंदोलन असेल. 

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट जिल्हाध्यक्ष ऍड. विक्रम तारे पाटील म्हणाले कि, मेहता आमदार नव्हते तेव्हा तत्कालीन आमदार विरोधात खड्डयां वरून फावडे, घमेले, क्वॉड गाडी घेऊन आंदोलन करत होते. आता ते आमदार निवडून आल्यावर खड्डयां साठी जनतेची माफी मागण्याची ढोंगबाजी करत आहेत. 

शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख मनोज मयेकर यांनी आरोप केला कि, सर्वत्र भ्रष्टाचार आणि स्वच्छ आमदार असे ब्रीद वाक्य सत्ताधारी मिरवत आहेत. मागच्यावेळी निवडणुकी आधी आंदोलनाची नौटंकी केली. आता पत्र देतात - माफी मागण्याचा कांगावा करतात. लवकरच दहीहंडी, गणेशोत्सव सारखे सण येत आहेत. त्यामुळे ६ ऑगस्ट पर्यंत खड्डे भरले नाही तर सर्व मिळून बंद करणार. 

काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंत यांनी सांगितले कि, २०१७ पासून पालिकेत भाजपाची सत्ता आहे. भ्रष्टाचार आणि पालिका लुटून कंगाल करून टाकली आहे. केवळ करोडोंचे ठेके काढून कामे मात्र बोगस निकृष्ठ करून लोकांची जीव घेतले जात आहेत. खड्डे बुजवात नाहीत, बस ठेकेदारास द्यायला पैसे नाहीत आणि भाजपा व पालिका सेलिब्रेशन करत आहेत. 

काँग्रेसचे माजी नगरसेवक जुबेर इनामदार, प्रवक्ते प्रकाश नागणे, युवक जिल्हाध्यक्ष सिद्धेश राणे ; शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख प्रभाकर म्हात्रे, धनेश पाटील,  प्राची पाटील ; राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटचे गुलाम नबी फारुकी, रवी दुबोले, विनोद जगताप, बाबुराव भिलारे आदींसह या सर्व पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. 

टॅग्स :mira roadमीरा रोडPotholeखड्डे