शहरं
Join us  
Trending Stories
1
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
2
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
3
अरेस्ट वॉरंटच्या मागणीविरोधात इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू संतप्त, ICC ला दिला असा इशारा 
4
Reel बनवण्याच्या नादात तरुणाने शेकडो फूट उंच कड्यावरून पाण्यात मारली उडी, बुडून मृत्यू   
5
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
6
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
7
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
8
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
9
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
10
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
11
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
12
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
13
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
14
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
15
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
16
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
17
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
18
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
19
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
20
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता

अतिरिक्त तोडफोडीला विरोध, व्यापा-यांनी दुकाने ठेवली बंद, नागरिक संतप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2017 1:38 AM

शहरातील मुख्य रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचे काम सुरू करण्यापूर्वी पालिकेच्या विकास आराखड्यानुसार रस्ता रुंदीकरण व अतिक्रमण काढण्याचे काम

भिवंडी : शहरातील मुख्य रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचे काम सुरू करण्यापूर्वी पालिकेच्या विकास आराखड्यानुसार रस्ता रुंदीकरण व अतिक्रमण काढण्याचे काम पालिका प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात हाती घेतले आहे. काही २ि२ठकाणी हे काम संपल्यानंतर अतिरिक्त सहा मीटर जागा तोडण्यासाठी अधिका-यांनी दुकाने, घरे व इमारतींवर लाल पट्ट्यांची निशाणी मारण्याचे काम सुरू केल्याने या मोहिमेला रहिवासी व व्यापा-यांनी कडाडून विरोध केला. याच्या निषेधार्थ कल्याण रोड व्यापारी-रहिवासी संघर्ष समितीने गुरुवारी काही काळ दुकाने बंद ठेवून पालिकेविरोधात आंदोलन केले होते. दरम्यान, पालिकेची ही अन्यायकारक कारवाई थांबवण्यासाठी व्यापा-यांनी खासदार कपिल पाटील, पोलीस उपायुक्त मनोज पाटील, महापौर जावेद दळवी, आयुक्त योगेश म्हसे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. रहिवाशांमधील संताप पाहून आयुक्तांनीही खासदारांनी केलेल्या विनंतीवरून सध्या हे काम थांबवले आहे.शहरातील अंजूरफाटा ते वंजारपाटीनाका आणि कल्याण रोड, राजीव गांधी चौक ते साईबाबा बायपास या रस्त्यांच्या दुतर्फा मोठ्या संख्येने अतिक्रमणे झाली आहेत. त्यामुळे पादचाºयांना रस्त्यावरून चालणे कठीण झाले आहे. तसेच रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे अपघात व वाहतूककोंडीचा प्रश्न निर्माण झाला आहे. या मार्गाजवळ मेट्रो रेल्वेचा प्रस्ताव आहे. पालिका आयुक्त योगेश म्हसे यांनी एमएमआरडीएच्या माध्यमातून रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचे काम हाती घेतले आहे. त्यासाठी आयुक्तांनी या मार्गावरील रहिवासी व दुकानदारांना नोटिसा पाठवल्या आहेत. त्याप्रमाणे नागरिकांनी विकास आराखड्यानुसार प्रस्तावित २४ मीटर जागा मोकळी करून दिली. रस्त्यात बाधा निर्माण करणारे अतिक्रमण पालिकेने दूर केले.प्रशासनाने याव्यतिरिक्त सहा मीटर जागेसाठी वर्तमानपत्रात जाहिरात देत नोटिसा बजावल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. दरम्यान, तोडलेल्या जागी रहिवाशांनी दुरुस्तीची कामे पूर्ण केली असताना पुन्हा सहा मीटर तोडण्यासाठी इमारतींवर लाल पट्टे मारल्याने नागरिकांनी नकार दिला. तसेच यापूर्वी झालेल्या रस्ता रुंदीकरणासाठी बाधित दुकानदार व रहिवाशांना कोणताही मोबदला पालिका प्रशासनाने न दिल्याचा मुद्दा कल्याण रोड व्यापारी-रहिवासी संघर्ष समितीच्या सदस्यांनी खासदार पाटील, पोलीस उपायुक्त मनोज पाटील व पालिका आयुक्त योगेश म्हसे यांच्याकडे झालेल्या बैठकीत उपस्थित केला.शहराच्या विकासासाठी हे काम हाती घेतले आहे, असे आयुक्तांनी सांगून तोडकाम सुरू ठेवू, अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे संतप्त रहिवाशांनी महापौर जावेद दळवी व पाटील यांच्याकडे धाव घेत प्रशासन करत असलेल्या अन्यायाची माहिती दिली. त्यामुळे पाटील यांनी आयुक्त म्हसे यांच्याशी संपर्क साधत कारवाई थांबवण्याची सूचना केली. तसेच यासंदर्भात बैठक घेण्याबाबत सांगितले. या बैठकीत माजी नगरसेवक दिन मोहम्मद खान, अनिल फडतरे, राम लहारे, शादाब उस्मानी, सुधाकर आंचल, सुभाष गुप्ता, प्रदीप पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.शहरात केंद्र सरकार व एमएमआरडीएच्या निधीतून ५२ रस्त्यांचे काँक्रिटीकरण करणे प्रस्तावित आहे. त्याबरोबर बेकायदा बांधकामांना आळा घालण्यासाठी व रस्ता रुंदीकरणाच्या निमित्ताने अशा इमारती तोडणे आवश्यक आहे. परंतु, पालिकेचे अधिकारी बेकायदा बांधकामांकडे दुर्लक्ष करत आहे, असा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका