शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
4
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
5
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
6
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
7
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
8
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
9
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
10
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
11
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
13
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
14
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
15
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
16
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
17
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
18
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
19
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
20
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन

महाराष्ट्रातही नागरिकत्व कायद्याला विरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2020 06:13 IST

महाराष्ट्रातल्या संतांच्या भूमीत, डॉ. बाबासाहेबांच्या महाराष्ट्रात आणि देशाच्या मँचेस्टर शहरात आल्याने अभिमान वाटत असून पाच वर्षांचा नागरिकांच्या मनातील लाव्हा असा आंदोलनाच्या माध्यमातून देशभर उमटत आहे.

भिवंडी : पंजाब आणि केरळ सरकारप्रमाणेच महाराष्ट्रातही सीएए, एनआरसी, एनपीआर कायद्यांना विरोध करणार असल्याचे स्पष्ट प्रतिपादन राज्याचे मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी शनिवारी भिवंडीतील जाहीर सभेत केले. केंद्र सरकारने जबरदस्तीने लागू केलेल्या या कायद्याला कुणीही घाबरू नये, असे आवाहनही आव्हाड यांनी केले.भिवंडीतील धामणकरनाका परिसरातील धोबीतलाव येथील स्व. परशुराम टावरे स्टेडियम येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. भिवंडीतील पुरोगामी पक्ष, संघटनांच्या संविधान बचाव संघर्ष समितीच्या वतीने या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते.आव्हाड म्हणाले, केंद्र सरकारने आणलेला नागरिकत्व सुधारणा कायदा संविधानाच्या विरोधात असून याविरोधात आपण स्वत: ठाणे येथे पहिले आंदोलन केले. जोपर्यंत हा कायदा केंद्र मागे घेत नाही, तोपर्यंत जेथेजेथे आंदोलन होईल, तेथेतेथे मी सहभागी होणार आहे. देशात पारधी समाज मोठ्या प्रमाणात असून त्यांच्याकडे नागरिकत्व सिद्ध करणारी कोणतीही कागदपत्रे नाहीत. त्यांना मोठी अडचण निर्माण होणार आहे. हा कायदा हिटलरशाही प्रवृत्तीच्या लोकांनी जाणीवपूर्वक लागू केला आहे. तो डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या समतेला छेद देणारा असल्याने कायद्याविरोधातील लढाई ही डॉ. आंबेडकरांची गोळवलकरांशी लढाई आहे, असेही आव्हाड म्हणाले. या कायद्याला विरोध म्हणून येत्या २६ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता राज्यातील प्रत्येक चौकाचौकांत संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करून या कायद्याला आपला विरोध दर्शविण्याचे आवाहन त्यांनी केले.याप्रसंगी माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे-पाटील, शेतकरी नेते योगेंद्र यादव, जेएनयू विद्यार्थी नेते उमर खालिद, अलिगढ विद्यापीठातील विद्यार्थी नेता सलाह अहमद सादरी, माजी आयपीएस अधिकारी अब्दुल रेहमान, जेएनयू विद्यार्थिनी नेत्या डॉ. उमेजा, निदा शेख, दिल्ली जामिया विद्यापीठाचे विद्यार्थी नेते डॉ. मोहम्मद कामरान,समाजसेवक मुश्तमा फारूक, संविधान बचाव संघर्ष समितीचे निमंत्रक किरण चन्ने, सहनिमंत्रक कॉ. विजय कांबळे, मो. अली शेख, शादाब उस्मानी आदी उपस्थित होते.मोदींविषयी जनतेत संभ्रममहाराष्ट्रातल्या संतांच्या भूमीत, डॉ. बाबासाहेबांच्या महाराष्ट्रात आणि देशाच्या मँचेस्टर शहरात आल्याने अभिमान वाटत असून पाच वर्षांचा नागरिकांच्या मनातील लाव्हा असा आंदोलनाच्या माध्यमातून देशभर उमटत आहे. स्वत:ला विकासपुरु ष समजणारे मोदी विकासपुरु ष आहेत की विनाशपुरु ष, असा संभ्रम आता निर्माण झाला आहे. त्यामुळे मोदींनी या जनआंदोलनाकडे उघड्या डोळ्यांनी पाहावे, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते योगेंद्र यादव यांनी केले.

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकbhiwandiभिवंडीJitendra Awhadजितेंद्र आव्हाड