शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

ठाणे शहर मतदारसंघावर तुळशीपत्र ठेवण्यास विरोध, भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मांडली भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2024 13:05 IST

ठाण्यातील चार विधानसभा मतदारसंघात संघटनात्मक बांधणी आणि पक्षातील पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी गुजरात आणि गोव्यातील आमदार, खासदार ठाण्यात आले आहेत.

ठाणे : ठाणे शहर हा भाजपचा परंपरागत मतदारसंघ सोडून शिंदेसेनेकडील ओवळा-माजिवडा मतदारसंघ भाजपमधील एका प्रभावशाली महिला नेत्याकरिता घेण्याची चर्चा सुरू होती. परंतु भाजपचा परंपरागत ठाणे शहर विधानसभा मतदारसंघ कोणत्याही परिस्थितीत सोडू नये, अशी ठाम भूमिका ठाण्यातील पदाधिकाऱ्यांनी ठाण्यात गुजरात, गोव्यातून आलेल्या निवासी प्रभारींसमोर घेतली. 

 ठाण्यातील चार विधानसभा मतदारसंघात संघटनात्मक बांधणी आणि पक्षातील पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी गुजरात आणि गोव्यातील आमदार, खासदार ठाण्यात आले आहेत. मागील काही दिवसांपासून परराज्यातून आलेल्या या नेत्यांकडून ठाणे, ओवळा-माजिवडा, मुंब्रा-कळवा आणि कोपरी-पाचपाखाडी या विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या जात आहेत. गुरुवारी मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांबरोबर या निवासी प्रभारींनी बैठक घेतली. बैठकीत मतदानाचा टक्का वाढविण्याबरोबरच या चारही मतदारसंघात महायुतीमधील कोणताही उमेदवार असला तरी त्याच्यासाठी आपल्याला काम करायचेच आहे, असा सल्ला देण्यात आला. 

भाजपच्या माजी नगरसेवकांची या नेत्यांनी एक बैठक घेतली. बैठकीत कोपरी-पाचपाखाडी, मुंब्रा-कळवा आणि ओवळा-माजिवडा वगळून केवळ ठाणे हा मतदारसंघ भाजपचा पांरपरिक मतदारसंघ असल्याचे सांगत, हा मतदारसंघ आपल्याकडे होता आणि तो आपल्याकडेच राहावा, असे मत माजी नगरसेवकांनी निवासी प्रभारी यांच्याकडे व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

भाजपमधील सोशल मीडिया हाताळणाऱ्या प्रभावशाली महिला नेत्याकरिता ठाणे शहरसारख्या परंपरागत मतदारसंघाचा त्याग करण्यास माजी नगरसेवकांनी सक्त विरोध केला.  राज्यातील वरिष्ठ नेते यासंदर्भात कोणती भूमिका घेणार, याकडे लक्ष लागले आहे. ओवळा-माजिवडा हा शिंदेसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांचा गड असल्याने शिंदेसेना हा मतदारसंघ सोडण्यास तयार होणार नाही, असे संकेत आहेत.

लोकसभा निवडणुकीत ठाणे व कल्याण मतदारसंघावरून दीर्घकाळ भाजप व शिंदेसेनेत दबावतंत्राचा खेळ सुरू होता. त्यामुळे दोन्ही पक्षातील संबंध ताणले गेले. त्याचा फटका भिवंडी लोकसभा मतदारसंघात भाजपला बसला. यावेळी त्याची पुनरावृत्ती होऊ नये, अशी पदाधिकाऱ्यांची इच्छा आहे. 

टॅग्स :BJPभाजपाvidhan sabhaविधानसभाthaneठाणे