शहरं
Join us  
Trending Stories
1
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
2
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
3
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
4
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
5
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
6
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
7
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
8
नवीन वर्षात करा नवीन भाषा शिकण्याचा संकल्प, मिळेल आयुष्याला कलाटणी; पाहा सोप्या टिप्स
9
३१ डिसेंबरला अयोध्येतील राम मंदिर खरोखरच बंद राहणार का? महत्त्वाची माहिती आली समोर
10
विधानसभेला संधी हुकली कृष्णराज महाडिक आता महापालिका निवडणूक लढवणार, प्रभागही ठरला!
11
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये मविआ-मनसतील ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
12
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
13
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
14
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
15
Crime: धक्कादायक! आयटी कंपनीच्या महिला मॅनेजरवर धावत्या कारमध्ये सामूहिक बलात्कार
16
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
17
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
18
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
19
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
20
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
Daily Top 2Weekly Top 5

डिजी ठाणेस विरोध करणारा अधिकारी सक्तीच्या रजेवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2020 01:28 IST

मुदत संपण्याआधीच निविदेला मुदतवाढ दिल्याचे डिजी ठाण्याचे प्रकरण महापालिकेत गाजत आहे.

ठाणे : मुदत संपण्याआधीच निविदेला मुदतवाढ दिल्याचे डिजी ठाण्याचे प्रकरण महापालिकेत गाजत आहे. त्यात आता ज्या कालावधीत या प्रकरणाला मंजुरी दिली, त्यावेळेच्या संबंधित विभागाच्या मुख्य माहिती तंत्रज्ञान अधिकारी स्वरूप कुलकर्णी यांना प्रशासनानेच सक्तीच्या रजेवर पाठवून त्यांना एक महिन्याचा पगारही दिला नसल्याचे उघड झाले आहे. मात्र, विधिमंडळात या प्रकल्पाचे वाभाडे निघाल्यानंतर याच अधिकाऱ्यास त्याची उत्तरे देण्यासाठी मंत्रालयात प्रशासनाकडून धाडण्यात येत असल्यामुळे त्याने आता व्यथित होऊन अनेक प्रश्न करून प्रशासनासमोर नवे संकट उभे केले आहे.काहीही चूक नसताना सक्तीच्या रजेवर पाठविल्यामुळे माझी सामाजिक, आर्थिक तसेच प्रशासकीय पातळीवर कुचंबणा होत असून त्याचा मानसिक त्रासही होत असल्याचे त्याने म्हटले आहे. त्याच्या मदतीला महापौर नरेश म्हस्के हे धावून आले असून त्यांनी प्रशासनाला याबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.महापालिकेचा देशातील पहिला डिजिटल प्रकल्प वादात सापडण्याची चिन्हे असून संबंधित एजन्सीला मुदतवाढ देऊन २२ कोटींचे बिल अदा केल्याचे विधानसभेतही पडसाद उमटले आहेत. ज्या अधिकाºयाच्या गैरहजेरीत हे प्रकरण घडले, त्या कुलकर्णी यांनाच मंत्रालयात जबाब देण्यासाठी पालिकेने पाठविले आहे. त्यामुळे त्यांनी उपायुक्त ओमप्रकाश दिवटे यांना पत्र लिहून मला सक्तीच्या रजेवर तुम्हीच पाठविले होते. त्या महिन्याचा पगारही दिलेला नाही किंवा रजेवर पाठविण्यामागचे कारणही आपण दिलेले नाही. माझ्याकडून काही चुकीचे झाले आहे का? किंवा मला रजेवर जाण्यासाठी कोणत्याही स्वरूपाचे पत्र किंवा कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेली नाही. असे असताना मला सक्तीच्या रजेवर पाठविण्यामागचे कारण काय? असे अनेक प्रश्न त्यांनी विचारले आहेत.>महापौरांनी मागविला अहवालयासंदर्भात महापौर नरेश म्हस्के यांनीही अतिरिक्त आयुक्त समीर उन्हाळे यांना पत्र पाठवून कुलकर्णी यांनी जे काही प्रश्न केले आहेत, त्याची उत्तरे द्यावीत, अशा प्रकारे अधिकाºयावर कारवाई करून त्याचे मानसिक संतुलनही बिघडविण्याचे काम या माध्यमातून झाले आहे. त्यामुळे या विषयामागचे नेमके कारण स्पष्ट करावे तसेच याचा अहवाल तत्काळ सादर करावा, अशा सूचनाही केल्या आहेत. यामुळे प्रशासन चांगलेच गोत्यात आले आहे.>नियमबाह्य कामास केला होता विरोध : ज्या वेळेस मुदत संपण्याआधीच निविदेला वाढीव मुदतवाढ देण्याचे प्रकरण घडत होते, त्यावेळेस या अधिकाºयाला सदर प्रस्तावावर स्वाक्षºया करण्यास भाग पाडले जात होते. परंतु, त्याने या नियमबाह्य प्रकाराला विरोध केल्यानेच त्याला सक्तीच्या रजेवर पाठविल्याची माहिती पालिकेतील सूत्रांनी दिली आहे.>अद्याप माझ्या कडे ते पत्र आलेले नाही, त्यामुळे त्या पत्रात नेमका काय उल्लेख आहे, तो पाहिल्याशिवाय त्यावर भाष्य करणे शक्य नाही.- समीर उन्हाळे,अतिरिक्त आयुक्त, ठामपा

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका