शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

मीरा रोडला बेकायदा कॉल सेंटर उघड; सात जण अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2018 05:32 IST

मीरा रोडमध्ये एका बेकायदा कॉल सेंटरमधून अमेरिकेतील नागरिकांना कराची थकबाकी असल्याचे धमकावून त्यांच्याकडून पैसे उकळणाऱ्या सात

मीरा रोड : मीरा रोडमध्ये एका बेकायदा कॉल सेंटरमधून अमेरिकेतील नागरिकांना कराची थकबाकी असल्याचे धमकावून त्यांच्याकडून पैसे उकळणाऱ्या सात जणांना शनिवारी ठाणे ग्रामीण पोलिसांनीअटक केली. आरोपी हे गिफ्टकार्ड वा आयट्यूनद्वारे डॉलरचे बीट कॉइनमध्ये व नंतर भारतीय चलनात पैसे वळते करत होते. त्यांचे संगणक, मोबाइल जप्त केले आहेत.

सहायक पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी मागील आठवड्यात भाजपा नगरसेवक मदन सिंग यांचा मुलगा ऋषी (२६) याला अटक केली होती. दिल्लीतील साथीदारांमार्फत मिळालेल्या डाटाच्या आधारे तो अमेरिकन नागरिकांना ठकवून त्यांच्या गिफ्टकार्ड, आयट्यूनद्वारे डॉलरमधून बीट कॉइन खरेदी करत असे. नंतर, भारतीय चलनात वळते करून स्वत:चे कमिशन घेऊन बाकी रक्कम दिल्लीतील साथीदारांना देत असे. दिल्लीतील त्याच्या साथीदारांचा शोध सुरू केला होता. तपासादरम्यान मीरा रोडच्या सेव्हन स्क्वेअर शाळेजवळील अमृता सदन इमारतीत बेकायदा कॉल सेंटर चालवली जात असल्याची माहिती मिळाली. शुक्रवारी मध्यरात्री कुलकर्णी व त्यांच्या पथकाने सदनिकेवर छापा घातला. तेथे चार कर्मचारी व चालक असे पाच जण आढळले. जुबेर अब्दुल कादर शेख (२६), राजू राठोड (२९), हर्ष काझी (२३), सौरभ झा (२९), विनोद नायर (२५), साबिओ गोन्सालवीस (४२), सिद्धार्थ पिल्ले (२२) अशी आरोपींची नावे आहेत. यातील जुबेर हा प्रमुख सूत्रधार असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.अमेरिकन भाषेत उच्चारकॉल सेंटरचालकाने अमेरिकेतील नागरिकांची व्यक्तिगत माहिती, त्यांचा क्रमांक, कर व करभरणा आदींचा डाटा मिळवला होता. त्याआधारे आयपी कॉलिंग सॉफ्टवेअरद्वारे कॉल सेंटरमधून अमेरिकन उच्चारात नागरिकांना कॉल करून आपण कर विभागातून बोलत असल्याचे सांगायचे. तुमचा कर बाकी आहे वा चुकवला असल्याचे सांगून कारवाईची भीती दाखवायचे. संगणकात व्हायरस आहे, असे सांगून अ‍ॅण्टीव्हायरस आदी खरेदी करायला लावायचे.

टॅग्स :thaneठाणेArrestअटकPoliceपोलिसcyber crimeसायबर क्राइम