शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
3
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
4
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
5
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
6
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
7
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
8
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
9
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
10
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
11
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
12
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
13
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
14
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
15
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
16
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
17
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
18
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
19
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
20
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  

२७ गावांत ८० हजार अनधिकृत बांधकामे , माहिती अधिकारात उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2017 2:11 AM

कल्याण-डोंबिवली महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या २७ गावांमध्ये परवानगी घेऊन केलेल्या अधिकृत बांधकामांचा आकडा अवघा ६२ असल्याचे माहितीच्या अधिकारात उघड झाल्याने

मुरलीधर भवार कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या २७ गावांमध्ये परवानगी घेऊन केलेल्या अधिकृत बांधकामांचा आकडा अवघा ६२ असल्याचे माहितीच्या अधिकारात उघड झाल्याने जवळपास ८० हजारांच्या घरात बेकायदा बांधकामे करणाºयांचे पितळ उघडे पडले आहे. एमएमआरडीकडे या गावांच्या नियोजनाची जबाबदारी असताना त्यांनी यावर कारवाई केली नाही आणि कल्याण-डोंबिवली महापालिकेत दोन वर्षांपूर्वी ही गावे येऊनही पालिकेनेही या बांधकामांवर हातोडा न उगारल्याने नजिकच्या काळात या बांधकामांचा मुद्दा गंभीर स्वरूप धारण करण्याची शक्यता आहे.सोनारपाडा येथे राहणारे बाळाराम ठाकूर यांनी माहितीच्या अधिकारात कल्याण डोंबिवली महापालिकेने व एमएमआरडीएने किती बांधकामांना परवानगी दिली, त्याचा तपशील मागवला होता. त्यात पालिकेने २७, तर एमएमआरडीएने ३५ बांधकामांना परवानगी दिल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे अधिकृत बांधकामांचा आकडा ६२ असल्याचे स्पष्ट झाले. २००७ पासून किती बांधकामांना परवानगी दिली, असा प्रश्नही ठाकूर यांनी विचारला होता. तेव्हा गावांचे नियोजन एमएमआरडीएकडे होते. तेव्हाचा आकडा ३५ असा आहे. ही २७ गावे १ जून २०१५ पासून पालिकेत समाविष्ट झाल्याने पालिकेची माहिती ही २०१५ पासूनच्या बांधकाम परवानगीवर आधारित आहे.एमएमआरडीएने परवानगी न देताही २७ गावात चाळी आणि चार, आठ, १२ मजली इमारती अशी हजारोंच्या संख्येने बेकायदा बांधकामे उभी राहिली. त्यांच्यावर प्राधिकरणाने हातोडाच उगारला नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.कारवाई कधी व कशी करणार याविषयी ठाकूर यांनी महापौर, आयुक्त, एमएमआरडीए, जिल्हाधिकाºयांकडे पत्रव्यवहार केला. त्यातील एकाही पत्राला यातील कुणीही उत्तर न दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका