अवैध क्रॉसिंगने घेतला एकाचा बळी

By Admin | Updated: May 5, 2017 05:28 IST2017-05-05T05:28:42+5:302017-05-05T05:28:42+5:30

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर वाडे येथे अवैध क्र ॉसिंग वर झालेल्या मोटर अपघातात एक जण जागीच ठार तर तीन जण

One of the victims of illegal crossings has been killed | अवैध क्रॉसिंगने घेतला एकाचा बळी

अवैध क्रॉसिंगने घेतला एकाचा बळी

मनोर : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर वाडे येथे अवैध क्र ॉसिंग वर झालेल्या मोटर अपघातात एक जण जागीच ठार तर तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना सिल्व्हासा येथील रूग्णालयात दाखल केले आहे. आपल्या धंद्यासाठी अवैध क्रॉसींग तयार करून ठेवल्यामुळे त्या ठिकाणी मोटर अपघात होऊन आता पर्यंत शेकडो निष्पाप लोकांचा बळी गेला आहे त्याला जबाबदार आय आर बी.
मुंबई अहमदाबाद महामार्गावर वाडे गावाच्या हद्दीत पेट्रोल पंपावरून भला मोठा ट्रेलर मुबई वाहिनी वर अवैध क्रॉसींग करीत असतांना मुंबईहून गुजरात च्या दिशेने जाणाऱ्या स्विफ्ट कार च्या चालकाला समोर आडवा असलेल्या ट्रेलर चा अंदाज न आल्याने कार त्यावर जोरदार धडकल्याने कारचालक विनायक त्र्यंबक धोंडिया याचा जागीच मृत्यू झाला तर किशोर धोडिया, दिनेश धोंडिया, विनोद हे तिघे गंभीर जखमी असून त्यांना सिल्वासा गुजरात येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
मुंबई अहमदाबाद महामार्गावर हलोली पाटील पाडा येथील मुंबई वाहिनीवर असलेल्या मॅक्डोनल्डस् हॉटेलचालकाने हॉटेलमध्ये गुजरात वाहिनीवरील वाहनांना येता यावे यासाठी डिव्हायडर तोडून अवैध क्रॉसींग बनवले आहे. तिथे हि अनेक वेळा अपघात होऊन निष्पापांचे प्राण गेले आहे. आयआरबीच्या हजगर्जीने हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. (वार्ताहर)

Web Title: One of the victims of illegal crossings has been killed