झाडाची फांदी पडल्याने एक जण जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:46 IST2021-08-20T04:46:51+5:302021-08-20T04:46:51+5:30
ठाणे : मार्केटमध्ये रस्त्याने पायी निघालेल्या दिलीप परशुराम चव्हाण (५६) यांच्या अंगावर रस्त्यालगत असलेल्या झाडाची मोठी फांदी पडल्याची घटना ...

झाडाची फांदी पडल्याने एक जण जखमी
ठाणे : मार्केटमध्ये रस्त्याने पायी निघालेल्या दिलीप परशुराम चव्हाण (५६) यांच्या अंगावर रस्त्यालगत असलेल्या झाडाची मोठी फांदी पडल्याची घटना गुरुवारी दुपारी कळव्यातील कावेरी सेतू रस्त्यावर घडली. यामध्ये चव्हाण यांच्या डोक्याला आणि पायाला दुखापत झाली आहे. त्यातच डोक्याला सात टाके पडले आहेत. ही दुखापत गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.
चव्हाण हे कळव्यातील सुदामा सोसायटीच्या दुसऱ्या मजल्यावर वास्तव्यास आहेत. ते गेल्या वर्षी बीएमसीमधून सेवानिवृत्त झाले असून, त्यांची यंदा गणपतीला गावी जाण्याची लगबग सुरू होती. सामान खरेदीसाठी गुरुवारी दुपारी ते मार्केटमध्ये जात होते. याचदरम्यान अचानक झाडाची मोठी फांदी त्यांच्या अंगावर कोसळली. पुढील उपचारासाठी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात हलविल्याची माहिती ठामपा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संतोष कदम यांनी दिली.