शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

अनधिकृत इमारतीच्या बांधकामाची भिंत कोसळून एकाचा मृत्यू ; शहरातील रामनगर परिसरातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 17:48 IST

One killed when wall of unauthorized building collapses : या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.             

ठळक मुद्देअरविंद सिंग ( वय ४५ ) असे मयत कामगाराचे नाव असून रामनगर येथे एका इमारतीच्या पहिल्या मजल्याचे अनधिकृत बांधकाम सुरू होते.

नितिन पंडीत

भिवंडी - शहरातील गायत्रीनगर परिसरातील रामनगर येथे एका घराची भिंत कोसळून एका कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

           

अरविंद सिंग ( वय ४५ ) असे मयत कामगाराचे नाव असून रामनगर येथे एका इमारतीच्या पहिल्या मजल्याचे अनधिकृत बांधकाम सुरू होते. रविवारी दुपारी भिवंडीतील ग्रामीण भागासह शहरात सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळला . या वार पाण्यात अनधिकृत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीची भिंत कोसळली. हि भिंत इमारतीच्या बाजूला असलेल्या चाळीवर कोसळली. या चाळीच्या खोलीत अरविंद सिंग हा कामगार दुपारी विश्रांती घेण्यासाठी झोपला होता. मात्र भिंतीचा मलबा अरविंद याच्या अंगावर कोसळल्याने त्याखाली दबून अरविंद सिंग याचा जागीच मृत्यू झाला आहे. घटनास्थळी मनपाच्या आपत्ती विभागासह अग्निशमन दल व पोलीस दाखल झाले असून सध्या महापालिकेच्यावतीने या अनधिकृत इमारती वर तोडक कारवाई सुरू करण्यात आली आहे.

           

भिवंडी शहरात अनधिकृत बांधकामांवर मनपा आयुक्तांनी कारवाईचा बडगा उगारला असतांनाही अशा प्रकारे अनधिकृत बाबधकाम राज रोस पणे शहरात सुरूच असून मनपा आयुक्त संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांसह अनधिकृत बांधकाम करणाऱ्या घर मालकावर नेमकी कारवाई करणार का असा सवाल उपस्थित झाला आहे. 

टॅग्स :Deathमृत्यूbhiwandiभिवंडीPoliceपोलिस