उल्हासनगरमध्ये मारहाणीत एकाचा मृत्यू
By Admin | Updated: March 12, 2017 02:42 IST2017-03-12T02:42:09+5:302017-03-12T02:42:09+5:30
हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सह्याद्रीनगर येथे चाळीच्या बांधकामावरुन हाणामारी होऊन एकाचा मृत्यू झाला. या प्रकरणी जयराम भोईर, अनिकेत भोईर, महेश

उल्हासनगरमध्ये मारहाणीत एकाचा मृत्यू
उल्हासनगर : हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सह्याद्रीनगर येथे चाळीच्या बांधकामावरुन हाणामारी होऊन एकाचा मृत्यू झाला. या प्रकरणी जयराम भोईर, अनिकेत भोईर, महेश उर्फ मेहेरा शालिक वायले, हेमंत भोईर यांच्या विरोधात पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
उल्हासनगर महापालिका निवडणुकी दरम्यान बेकायदा बांधकामे उभी राहिली. प्रभाग क्रमांक ४ चे सभापती गणेश शिंपी यांच्या पथकाने निवडणुकी दरम्यान उभी राहिलेली बांधकामे पोलीस संरक्षणात जमीनदोस्त केली. मात्र इतर प्रभागात कारवाई झाली नाही. हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सह्याद्रीनगर येथील जुने गणपती मंदिरामागे चाळीचे बांधकाम सुरू आहे. शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास लाल भोईर हे मुलगा हरेश यांच्या सोबत बांधकामाचा जाब विचारण्यासाठी गेले होते. यावेळी जयराम, महेश, अनिकेत भोईर, हेमंत यांच्याशी भांडण होऊन त्याचे पर्यावसान हाणामारीत झाले. यात भोईर बेशुध्द झाले. त्यांना रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत म्हणून जाहीर केले. हरेश भोईर यांनी तक्रार दाखल केली. (प्रतिनिधी)
सह्याद्रीनगर हे माणेरेगाव व उल्हासनगर हद्दीवर असून येथे चाळीच्या बांधकामंना ऊत आला आहे. काही दिवसांपूर्वी पालिका हद्दीतील चाळीच्या बांधकामावर पाडकाम कारवाई केली, अशी माहिती सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी दिली असून याप्रकरणी हिललाईन पोलीस अधिक तपास करीत आहे.