उल्हासनगरात कारच्या धडकेत एकाचा मृत्यू, मद्यधुंद कार चालविणाऱ्याला अटक
By सदानंद नाईक | Updated: February 28, 2023 15:42 IST2023-02-28T15:40:05+5:302023-02-28T15:42:22+5:30
उल्हासनगर : शहरातील कल्याण ते बदलापूर रस्त्यावर सोमवारी रात्री १ वाजण्याच्या दरम्यान भरधाव कारच्या धडकेत अफशर शेख याचा जागीच ...

उल्हासनगरात कारच्या धडकेत एकाचा मृत्यू, मद्यधुंद कार चालविणाऱ्याला अटक
उल्हासनगर : शहरातील कल्याण ते बदलापूर रस्त्यावर सोमवारी रात्री १ वाजण्याच्या दरम्यान भरधाव कारच्या धडकेत अफशर शेख याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी मद्यधुंद अवस्थेत कार चालविणाऱ्या हरेश मुलचंदानी याला मध्यवर्ती पोलिसांनी अटक केली असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.
उल्हासनगरातून जाणारा कल्याण ते बदलापूर रस्ता भरधाव वाहनांमुळे अपघात रस्ता म्हणून ओळखला जात आहे. सोमवारी रात्री १ वाजण्याच्या दरम्यानफर्स्ट गेट येथे भरधाव एका कारने अफशर शेख या इसमाला जोरदार धडक देऊन झाडावर आढळली. या अपघातानंतर कार मध्ये असलेल्या मद्यधुंद काही जणांनी तेथून पळ काढला. तर जखमी झालेल्या अफशर शेख याला उपचारासाठी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी शेख याला तपासून मृत घोषित केले. मध्यवर्ती पोलिसांनी जलद तपास करून काही तासात कार चालक हरेश मुलचंदानी याला ताब्यात घेतले. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.