One hundred and nine thousand Surya Namaskars by the students | विद्यार्थ्यांनी घातले एक लाख नऊ हजार सूर्यनमस्कार
विद्यार्थ्यांनी घातले एक लाख नऊ हजार सूर्यनमस्कार

भिवंडी : भिवंडी शहरातील नवभारत इंग्लिश स्कूल या शाळेचे सुवर्णमहोत्सवी वर्ष सुरू आहे. त्यामुळे या सुवर्णमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून शाळा ५१ व्या वर्षात पदार्पण करत असल्याने शुक्रवारी सकाळी शाळेतील आजी-माजी विद्यार्थ्यांसह पालक यांच्या उपस्थितीत ५१ हजार सूर्यनमस्कार घालण्याचा संकल्प शाळेने पूर्ण केला. यावेळी उत्साही विद्यार्थ्यांनी एकूण ८६ हजार ७०७ सूर्यनमस्कार घातले. यानंतर सूर्यनमस्काराची स्पर्धाही घेण्यात आली. त्या माध्यमातून एकूण एक लाख आठ हजार ९८९ सूर्यनमस्कार घालून हा वर्धापनदिन उत्साहात साजरा करण्यात आला.

भिवंडी शहरातील एनईएस शाळा ही नावाजलेली शैक्षणिक संस्था आहे. येथून हजारो विद्यार्थ्यांनी शिक्षण घेऊ न वेगवेगळ्या क्षेत्रात नाव कमावले आहे. २०१८- १९ या शैक्षणिक वर्षात या शाळेचा सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरा करताना असंख्य सामाजिक, शैक्षणिक उपक्र म राबवून या वर्षाची सांगता केली. शाळा ५१ व्या वर्षात पदार्पण करीत असल्याने सूर्यनमस्कार या अनोख्या भारतीय योग व व्यायाम उपक्र माचे आयोजन करून वर्धापनिदन साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून क्रीडा महर्षी अरुण दातार, क्रीडा भारती संस्थेचे महामंत्री राज चौधरी, संस्थेचे अध्यक्ष कमलकिशोर हेडा, उपाध्यक्ष डॉ. विवेक जोशी, कार्यकारिणी सदस्य डॉ. राहुल जोशी, विनोद शेटे, दासभाई पेटेल, मुख्याध्यापक संजय कालगावकर, मुख्याध्यापिका (प्राथ.) सुप्रिया अस्वले, भावीन पटेल आदी मान्यवर उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अरु ण दातार यांनी या उपक्र माबद्दल आयोजकांचे कौतुक करतानाच सूर्यनमस्कारचा आवश्यक असून त्यामुळे बुद्धी व मन प्रफुल्लित होऊन आपणास चालना मिळते, असे सांगितले. याप्रसंगी सूर्य उपासना व सूर्यनाम यांच्या महत्त्वाविषयी आयोजकांच्या वतीने माहिती देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मानसी राजे यांनी केले.

विद्यार्थ्यांपर्यंत सूर्यनमस्कार पोहोचवण्याचा उद्देश
सध्याच्या जीवनशैलीमध्ये सूर्यनमस्कार युवा पिढी विसरत चालली आहे. भारतीय व्यायाम प्रकारातील सूर्यनमस्काराचे महत्त्व नव्या पिढीपर्यंत पोहचवणे, यासोबतच सध्या जीवनशैली बदलल्याने धावपळीच्या जीवनात असंख्य युवक मानसिक तणावासोबतच रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार यांना बळी पडत आहेत. त्यांना आपल्या भारतीय व्यायाम प्रकारातील सूर्यनमस्कार शिकवण्याच्या उद्देशाने हा उपक्र म आयोजित केल्याची माहिती संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. विवेक जोशी यांनी दिली .

Web Title: One hundred and nine thousand Surya Namaskars by the students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.