महाड-पोलादपूरसाठी ठाणे महापालिकेचा एक हात मदतीचा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:41 IST2021-07-27T04:41:36+5:302021-07-27T04:41:36+5:30

ठाणे : अतिवृष्टीमुळे रायगड जिल्ह्यातील महाड-पोलादपूर येथे भयावह परिस्थिती निर्माण झाली असून तेथील नागरिकांना मदत करण्यासाठी ठाणे महापालिकेच्या वतीने ...

One hand helping project of Thane Municipal Corporation for Mahad-Poladpur | महाड-पोलादपूरसाठी ठाणे महापालिकेचा एक हात मदतीचा उपक्रम

महाड-पोलादपूरसाठी ठाणे महापालिकेचा एक हात मदतीचा उपक्रम

ठाणे : अतिवृष्टीमुळे रायगड जिल्ह्यातील महाड-पोलादपूर येथे भयावह परिस्थिती निर्माण झाली असून तेथील नागरिकांना मदत करण्यासाठी ठाणे महापालिकेच्या वतीने एक हात मदतीचा हा उपक्रम हाती घेतला आहे. ठाणेकरांनी या उपक्रमासाठी सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन महापौर नरेश म्हस्के आणि आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी सोमवारी केले.

अतिवृष्टीमुळे महाड-पोलादपूर येथे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. स्थानिक नागरिकांचे संसार उद्ध्वस्त झाले असून त्यांना तातडीने जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा होणे गरजेचे आहे. त्या अनुषंगाने तेथील नागरिकांना मदत करण्यासाठी आयुक्तांच्या संकल्पनेतून महापालिकेच्या वतीने एक हात मदतीचा हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमात मिनरल वॉटर, कपडे, टॉवेल, खाण्याचे पदार्थ, अन्नधान्य (तांदूळ, खाद्यतेल, मीठ, मिरची इत्यादी), चादर, सतरंजी, डायपर, सॅनिटरी नॅपकिन, मेणबत्ती, टॉर्च तसेच लहान मुलांसाठी खाऊ आदींची मदत स्वीकारण्यात येत आहे.

इच्छुक नागरिकांनी ठामपा शाळा क्र. ४४, दत्तमंदिरसमोर शास्त्रीनगर बसस्टॉप, वर्तकनगर येथे सकाळी ९.०० ते सायं. ६.०० या वेळेत दीपाली पवार (९१५६८६४०२७), विनोद तमखाने (८८८८८७६१९४) यांच्याशी संपर्क साधावा तसेच महिला आधार केंद्र जहांगीर हाइट्स तत्त्वज्ञान विद्यापीठाच्या बाजूला घोडबंदर रोड येथे विजय टेकवाड (८६६८२८ ९५१०), विठ्ठल मोरे (९७६३३००६०२) आणि शाळा क्र.६९ कळवा प्रभाग समिती कळवा येथे ठाणे लखन जाधव (८८५०७१९३६१), राजेंद्र मोटे (८४२२९३६१८६) व रावसाहेब त्रिभुवन (७७३८०३५३६०) यांच्याशी संपर्क साधावा. या उपक्रमाच्या अधिक माहितीसाठी उपआयुक्त मनीष जोशी (९१६७०४३६०६), उपआयुक्त श्रीमती वर्षा दीक्षित (७३०४६५३२४९) आणि वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी हळदेकर (९७६९००७८७८) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.

Web Title: One hand helping project of Thane Municipal Corporation for Mahad-Poladpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.