रिक्षावर झाड कोसळल्याने एकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:42 IST2021-05-18T04:42:11+5:302021-05-18T04:42:11+5:30
उल्हासनगर : शहरात सोमवारी जोरदार वारे व पावसामुळे २५ पेक्षा जास्त झाडे उन्मळून पडली आहेत. तसेच अनेक घरांचे नुकसान ...

रिक्षावर झाड कोसळल्याने एकाचा मृत्यू
उल्हासनगर : शहरात सोमवारी जोरदार वारे व पावसामुळे २५ पेक्षा जास्त झाडे उन्मळून पडली आहेत. तसेच अनेक घरांचे नुकसान झाले. विजेच्या तारा व खांब पडल्याने अनेक भागातील वीजपुरवठा खंडित झाला. गांधी रोड येथील जय बाबाधामसमोर एक जुने झाड रिक्षावर पडून लखुमल रामचंद्र कामदार (६२) यांचा मृत्यू, तर सुनील प्रकाश माेरे (३२) हे गंभीर जखमी झाले.
उल्हासनगरातील गांधी रोड, कुर्ला कॅम्प व विविध भागांत २५ पेक्षा जास्त झाडे पडल्याचे सूत्रांनी सांगितले. जोरदार वाऱ्यामुळे अनेक इमारतींवरील पत्रे उडाले. तसेच झाडे घरांवर पडल्याने काहींचे नुकसान झाले. त्याचबरोबर वीजपुरवठा खंडित झाल्याने इमारतींमधील पाणीपुरवठ्यावर त्याचा परिणाम झाला. मोबाईल व इंटरनेटही ठप्प झाल्याने त्याचा फटका वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांना बसला.
-----------