शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवलीतील नगरसेवकाला ठार मारण्यासाठी भाजपाच्या नगरसेवकानेच दिली ५० लाखांची सुपारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2017 21:46 IST

डोंबिवलीतील भाजपा पुरस्कृत नगरसेवक कुणाल पाटील यांना मारण्यासाठी तब्बल एक कोटी रुपयांची सुपारी घेतल्याचा धक्कादायक खुलासा पोलिसांनी पडकण्यात आलेल्या एका आरोपीने केला आहे.

ठाणे : डोंबिवलीतील भाजपा पुरस्कृत नगरसेवक कुणाल पाटील यांना ठार मारण्यासाठी भाजपाच्याच एका जेष्ठ नगरसेवकाने ५० लाखांची सुपारी दिल्याचा धक्कादायक प्रकार ठाणे ग्रामीण पोलिसांनी पकडलेल्या दरोडेखोरांच्या चौकशीतून उघड झाला आहे. या दरोडेखोरांकडून तीन दरोडे उघड झाले असून त्यांच्याकडून तीन लाख ४० हजारांच्या रोकडसह एक रिव्हॉल्व्हर, एक पिस्टल, दोन गावठी कट्टे, १६ जिवंत काडतुसे आणि दोन मोटारसायकलीही जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली.कुणाल पाटील हे कल्याण-डोंबिवली महापालिकेचे भाजपा पुरस्कृत नगरसेवक आहेत. दरम्यान, त्यांना ठार मारण्यासाठी डोंबिवलीमधीलच नगरसेवकाने सुपारी दिली असून त्यातील १० लाख रुपये देखिल आगाऊ म्हणून घेतल्याचेही या दरोडेखोराने दिलेल्या कबूली जबाबात म्हटले आहे. ज्यावेळी कुणाल यांना मारण्यासाठी हे टोळके बाहेर पडले होते, त्यावेळी ते घराबाहेर न पडल्यामुळे या टोळीच्या हल्ल्यातून बचावल्याचेही त्यांनी सांगितले. भाजपच्या पुरस्कृत नगरसेवकाला भाजपच्याच जेष्ठ नगरसेवकाने ठार मारण्याची सुपारी दिल्याचे वृत्त पोलीस चौकशीतून बाहेर आल्यानंतर कल्याण डोंबिवली वर्तूळात एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे दरोडयाची चौकशी सुरु असतांना आता यासंदर्भातील नव्याने गुन्हा दाखल होणार असून त्याची स्वतंत्रपणे चौकशी केली जाणार असल्याचेही ठाणे ग्रामीणच्या एका बडया अधिका-याने ‘लोकमत’ ला सांगितले.- ठाणे ग्रामीण भागातील भिवंडीच्या कुडूस येथील एका दरोडयाचा तपास पोलीस अधीक्षक डॉ. महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक व्यंकट आंधळे, सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख यांच्या पथकाने १६ डिसेंबर रोजी सीसीटीव्ही तसेच खबºयांच्या आधारे भिवंडीतून कैलास घोडविंदे याला अटक केली. याच्याच माहितीच्या आधारे राजू शेट्टी, अलुद्दीन शेख, विजय मेनबन्सी अशा सहा जणांना अटक केली.त्यांच्यापैकी विजय मेनबन्सी यानेच दिलेल्या माहितीतून कुणाल पाटील यांना ठार मारण्याची सुपारी दिल्याचा प्रकार उघड झाल्याची माहिती समोर आली आहे.

टॅग्स :thaneठाणेcrimeगुन्हे