एक कोटी ५९ लाखांची फसवणूक
By Admin | Updated: August 6, 2015 01:21 IST2015-08-06T01:21:36+5:302015-08-06T01:21:36+5:30
पाच वर्षांपूर्वीच्या ठरावाच्या रद्दबातल झालेल्या अधिकारपत्राचा गैरवापर करून आॅल इंडिया शिप्स अॅण्ड गोट्स कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक

एक कोटी ५९ लाखांची फसवणूक
ठाणे : पाच वर्षांपूर्वीच्या ठरावाच्या रद्दबातल झालेल्या अधिकारपत्राचा गैरवापर करून आॅल इंडिया शिप्स अॅण्ड गोट्स कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक महंमद शकील इस्माईल यांनी कल्याणमधील एकाची एक कोटी ५९ लाख २४ हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
इस्माईल यांनी, २०१० रोजीच्या जमीन विक्री करण्याबाबतचा ठराव हा २०१२ च्या ठरावाद्वारे रद्दबातल करण्यात आला होता. असे असतानाही २०१० च्या ठरावातील अधिकारपत्राचा गैरवापर करून हेच अधिकारपत्र नोंदणी कार्यालयात दाखवून कंपनीची जमीन विकली.