ठाण्यातील मासुंदा तलावात उडी घेऊन एकाची आत्महत्या

By जितेंद्र कालेकर | Updated: December 23, 2023 19:25 IST2023-12-23T19:24:55+5:302023-12-23T19:25:06+5:30

नौपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा, ओळख पटविण्याचे काम सुरु

One committed suicide by jumping into Masunda lake in Thane | ठाण्यातील मासुंदा तलावात उडी घेऊन एकाची आत्महत्या

ठाण्यातील मासुंदा तलावात उडी घेऊन एकाची आत्महत्या

ठाणे: ठाण्यातील मासुंदा तलावात एका ३५ ते ४० वर्षीय पुरुषाने उडी घेऊन आत्महतया केल्याची घटना शनिवारी दुपारी ३.५० वाजण्याच्या सुमारास समोर आली. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला असून मृतदेहाची ओळख पटविण्यात येत असल्याचे नौपाडा पोलिसांनी सांगितले.

मासुंदा तलावाजवळील दत्त घाट याठिकाणी एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह असल्याची माहिती अग्निशमन दलाला रामू कोटल या तरुणाने दिली. त्याच माहितीच्या आधारे जवाहर बाग अग्निशमन दलासह आपत्ती व्यवस्थापन विभागाने पाण्यातून हा मृतदेह बाहेर काढला. त्याने नेमकी कोणत्या कारणाने उडी घेतली? त्याचे नाव काय? त्याचे नातेवाईक कोण आहेत? तो कुठे राहतो? या सर्वच बाबींचा तपास करण्यात येत असल्याचे नौपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र क्षीरसागर यांनी सांगितले.

Web Title: One committed suicide by jumping into Masunda lake in Thane

टॅग्स :thaneठाणे