दीड वर्षाच्या मुलावर गुन्हा!

By Admin | Updated: May 5, 2016 01:00 IST2016-05-05T01:00:33+5:302016-05-05T01:00:33+5:30

महापालिका प्रभाग समिती एकचे सहाय्यक आयुक्त नंदलाल समतानी यांनी पोस्टर्स आणि बॅनर्सवर कारवाई करतेवेळी चक्क दीड वर्षाच्या मुलावर उल्हासनगर पोलिस ठाण्यात गुन्हा

One-and-a-half-year offenders | दीड वर्षाच्या मुलावर गुन्हा!

दीड वर्षाच्या मुलावर गुन्हा!

उल्हासनगर : महापालिका प्रभाग समिती एकचे सहाय्यक आयुक्त नंदलाल समतानी यांनी पोस्टर्स आणि बॅनर्सवर कारवाई करतेवेळी चक्क दीड वर्षाच्या मुलावर उल्हासनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याचा प्रताप उघड झाला आहे. या प्रकाराने पालिकेसह पोलिसांचेही हसे झाले आहे. विनापरवाना लावलेल्या पोस्टर आणि बॅनर्सवर सध्या कारवाई सुरू आहे. कॅम्प नंबर एकमध्ये गौतम मोरे यांच्या वाढदिवसाचे पोस्टर लावले होते. त्यावर वेदांत गौतम मोरे व सौरा सागर बाविस्कर अशी शुभेच्छाची देणाऱ्यांची नावे होती. शहानिशा न करताच त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. नंतर वेदांत आणि सौरा ही दीड वर्षाची असल्याचे लक्षात आले. (प्रतिनिधी)

Web Title: One-and-a-half-year offenders