बाळकूम येथे दीड लाखांची घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:37 IST2021-04-14T04:37:08+5:302021-04-14T04:37:08+5:30

ठाणे : बाळकूम येथील एका घरातून ४२ हजार ५०० रुपयांच्या सोन्याच्या मंगळसूत्रासह एक लाख ३६ हजार ८०० रुपयांचे सोन्याचे ...

One and a half lakh burglary at Balkum | बाळकूम येथे दीड लाखांची घरफोडी

बाळकूम येथे दीड लाखांची घरफोडी

ठाणे : बाळकूम येथील एका घरातून ४२ हजार ५०० रुपयांच्या सोन्याच्या मंगळसूत्रासह एक लाख ३६ हजार ८०० रुपयांचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. याप्रकरणी बाळकूम येथील गृहिणीने कापूरबावडी पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दाखल केली आहे.

बाळकूम पाडा क्रमांक तीन येथील एक कुटुंब काही कामानिमित्त घराला कुलूप लावून घराबाहेर गेले होते. या काळात १२ एप्रिल रोजी दुपारी २ ते २.३५ या अवघ्या अर्ध्या तासाच्या काळातच चोरट्यांनी या बंद घराच्या दरवाजाच्या कुलपाचा कोयंडा तोडून त्यावाटे आत शिरकाव केला. त्यानंतर लोखंडी कपाटाचे दार तसेच लॉकरचा दरवाजा उचकटून आत ठेवलेल्या ३३ हजारांच्या सोन्याच्या नेकलेससह काही दागिने आणि २० हजारांची रोकड असा एक लाख ३६ हजार ८०० रुपयांचा ऐवज लंपास केला. आपल्या घरात चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर या कुटुंबीयांनी कापूरबावडी पोलीस ठाण्यात सोमवारी रात्री चोरीची तक्रार दाखल केली आहे. पोलीस उपनिरीक्षक एल.जी. सपकाळे हे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

Web Title: One and a half lakh burglary at Balkum