ओमींमुळे उल्हासनगरात मुख्यमंत्र्यांची सभा नाही?
By Admin | Updated: February 13, 2017 05:05 IST2017-02-13T05:05:10+5:302017-02-13T05:05:10+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा झाल्यास ओमी कलानी यांना मुख्यमंत्र्यांसोबत बसवावे लागणार, हे टाळण्यासाठी व निवडणुकीच्या काळात पुन्हा

ओमींमुळे उल्हासनगरात मुख्यमंत्र्यांची सभा नाही?
सदानंद नाईक / उल्हासनगर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा झाल्यास ओमी कलानी यांना मुख्यमंत्र्यांसोबत बसवावे लागणार, हे टाळण्यासाठी व निवडणुकीच्या काळात पुन्हा वाद नकोत, म्हणून मुख्यमंत्र्यांनी उल्हासनगरात सभा घेणे टाळल्याची चर्चा रंगली आहे.
ओमी टीमचा प्रवेश व भाजपाच्या पोस्टरवरील ज्योती कलानी यांची हजेरी आणि सोशल मीडियात मोदी-पप्पू कलानी यांच्या फोटोंसह फिरणारे पोस्टर यामुळे भाजपावर आधीपासूनच टीका होते आहे.
उल्हासनगर पालिका ताब्यात घेण्यासाठी भाजपाने कंबर कसली असून वरिष्ठ नेत्यांच्या आग्रहाखातर वादग्रस्त ओमी कलानी टीमला पक्षात प्रवेश दिला. त्यामुळे राज्यभर टीका होणार हे गृहीत होते. त्या वातावरणात उल्हासनगरच्या सभेत ओमी यांना डावलणे भाजपाला शक्य नाही. सभेवेळी ओमी यांच्या मांडीला मांडी लावून मुख्यमंत्र्यांना बसवावे लागणार आहे. त्यामुळे पुन्हा विरोधकांच्या हाती कोलीत दिले जाईल. त्यामुळे फडणवीस यांनी उल्हासनगरात सभा घेण्याचे टाळल्याचे बोलले जात आहे. ओमी टीमच्या प्रवेशावेळीही मुख्यमंत्री हजर राहिले नाहीत, ते त्यामुळेच.
त्यामुळे आता प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या चौक सभा होतील.