वृद्धेने केली कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:38 IST2021-05-01T04:38:10+5:302021-05-01T04:38:10+5:30

मुंब्राः येथील अमृतनगर परिसरात राहत असलेल्या रजिया बेगम या ७२ वर्षे वयाच्या वृद्धेने कोरोनावर मात केली. २० एप्रिलला त्यांना ...

The old man overcame Kelly Corona | वृद्धेने केली कोरोनावर मात

वृद्धेने केली कोरोनावर मात

मुंब्राः येथील अमृतनगर परिसरात राहत असलेल्या रजिया बेगम या ७२ वर्षे वयाच्या वृद्धेने कोरोनावर मात केली. २० एप्रिलला त्यांना उपचारांसाठी कौसा भागातील मौलाना अबुल कलाम स्टेडियममधील कोविड आरोग्य केंद्रात उपचारांसाठी दाखल केले होते. त्यावेळी त्यांची प्रकृती अतिशय नाजूक होती. तसेच त्यांच्या ऑक्सिजनची मात्रही खालावली होती. केंद्रातील अतिदक्षता विभागामध्ये त्यांच्यावर नऊ दिवस उपचार करण्यात आले. या उपचारांना त्यांनी योग्यपद्धतीने साथ दिल्याने त्या कोरोनामुक्त झाल्या असून, गुरुवारी त्या तसेच अतिदक्षता विभागातील इतर पाच आणि अन्य विभागांतील सहा जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना केंद्रातून सुटी दिल्याची माहिती केंद्राचे समन्वयक मुमताज शहा यांनी ‘लोकमत’ला दिली.

Web Title: The old man overcame Kelly Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.