शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉवेल-बनियान घालून विरोधक विधानभवनात; अनोख्या आंदोलनाने वेधले साऱ्यांचे लक्ष, सत्ताधारीही हसले
2
"खून झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना..."; महादेव मुंडे हत्या प्रकरण, सुप्रिया सुळेंची संतप्त पोस्ट
3
विमानांच्या इंजिनांचे आयुष्य किती असते? एअर इंडियाच्या विमानाला होती अशी इंजिने, जी...
4
५ मुलांची आई अन् १३ वर्षांचा संसार; २४ वर्षांच्या मुलाच्या प्रेमात पडली आणि जीव गमावला! नेमकं काय झालं?
5
पाकिस्तानात हायव्हॉल्टेज ड्रामा! देशात राजकीय खळबळ; फिल्ड मार्शल मुनीर बनणार राष्ट्रपती?
6
Khuldabad Rename: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबादचे नाव बदलून रत्नापूर करण्याची मागणी!
7
गरमा गरम समोसे, गोड गोड जिलेबी की यम्मी पिझ्झा... आरोग्यासाठी काय आहे सर्वात घातक?
8
"मी मुलीशिवाय जगू शकणार नाही..."; लेकीने आयुष्य संपवल्यावर आईनेही मृत्यूला कवटाळलं
9
भारीच! एक रिल बनवा अन् १५ हजार जिंका, सरकारकडून पैसे मिळवा; जाणून घ्या सविस्तर
10
Lunchbox Recipe: दुधीची भाजी नको? ट्राय करा दुधीचे खमंग पराठे; करा झटपट, खा चटचट!
11
राहुल गांधींविरोधात किती खटले? किती प्रकरणांमध्ये मिळालाय जामीन? जाणून घ्या...
12
"इंग्लिश मीडियममध्ये शिकला, बायको ख्रिश्चन आणि हा म्हातारा...", 'बिग बॉस' फेम रीलस्टारने मराठीवरुन रितेश देशमुखला डिवचलं
13
"हा एक नवीन पायंडा काही मोजक्या पत्रकारांनी पाडलाय"; राज ठाकरे संतापले, नेमकं काय घडले?
14
चीनच्या मिसाईलमुळे भारतानं S-400 एअर डिफेन्स सिस्टिम गमावली? समोर आलं धक्कादायक सत्य
15
"प्रत्येक सीननंतर सांगितलं किस करायला...", 'अक्सर२'मध्ये फसवून केलेलं अश्लील शूट, जरीनचा धक्कादायक खुलासा
16
सहा वर्षांच्या लेकीला मारलं अन् घरातच कुजत ठेवला मृतदेह! आईच इतकी क्रूर का झाली?
17
"मंत्री माझ्या वडिलांच्या पाया पडतात, तू..."; भाजपा नेत्याच्या मुलाची धमकी, महिलने संपवलं जीवन
18
"तुम्ही भारताचे पंतप्रधान असाल किंवा चीनचे राष्ट्राध्यक्ष, पण जर तुम्ही..."; नाटोच्या प्रमुखांची तीन देशांना थेट धमकी
19
हृदयद्रावक! लेकीच्या साखरपुड्याआधी वडिलांना मृत्यूने गाठलं, २० सेकंदात ३ ट्रकने चिरडलं
20
लग्न खरं नाही, पण मजा १००% खरी! दिल्ली-पुण्यात सुरु झालाय 'फेक वेडिंग'चा नवा ट्रेंड, तरुणाई करतेय लाखो खर्च

पदाधिकाऱ्यांनी बळकावली मोक्याची हॉटेल

By admin | Updated: February 3, 2017 03:14 IST

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला येणाऱ्या निमंत्रित साहित्यिकांसाठी विविध हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. संमेलनाच्या पूर्वसंध्येला

- मुरलीधर भवार, डोंबिवलीअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला येणाऱ्या निमंत्रित साहित्यिकांसाठी विविध हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. संमेलनाच्या पूर्वसंध्येला साहित्यिक डोंबिवलीत दाखल होणे अपेक्षित होते. मात्र, विविध हॉटेलमध्ये विचारणा केली असता साहित्यिक डोंबिवलीत दाखल झालेले नव्हते. मात्र, मोक्याची हॉटेल मराठी साहित्य महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी बळकावल्याचे दिसून आले. संमेलनाला जवळपास २०० साहित्यिकांना निमंत्रित करण्यात आले आहे. त्यातील काही साहित्यिकांची रसिकांनी ‘साहित्यिक आपल्या घरी’ या उपक्रमांतर्गत राहण्याची व्यवस्था करावी, असे आवाहन आयोजकांनी केले होते. त्याला ३० पेक्षा जास्त रसिकांचा प्रतिसाद मिळाला. आयोजकांनी सांगितले की, किमान १२० साहित्यिकांची हॉटेलमध्ये व्यवस्था केली आहे. त्यासाठी आयोजकांनी हॉटेल सुयोग, विजयसागर, कुशाला आणि नंदी पॅलेस ही चार बडी हॉटेल्स बुक केली आहेत. त्यापैकी विजयसागर व कुशाला ही साहित्य संमेलनच्या पु.भा. भावे नगरीपासून बरीच दूर आहेत. तेथे चौकशी केली असता सायंकाळपर्यंत एकही साहित्यिक उतरलेले नाहीत. मात्र, आयोजकांनी रूम बुक केल्या आहेत, असे हॉटेल व्यवस्थापनाने स्पष्ट केले. सुयोग व नंदीपॅलेस ही दोन्ही हॉटेल्स पु.भा. भावे साहित्यनगरीपासून तुलनेत जवळ आहेत. ‘सुयोग’मध्ये अखिल भारतीय महामंडळाच्या आठ सदस्यांचे सकाळी ११ वाजताच आगमन झाले. त्यांनी तेथे दुपारी विश्रांती घेतली, तर काही शहरात फेरफटका मारायला गेल्याची माहिती मिळाली. ‘नंदी पॅलेस’मध्ये महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी व अन्य तीन पदाधिकाऱ्यांचे वास्तव्य आहे. या दोन्ही हॉटेलमध्ये साहित्यिकांचे वास्तव्य नसल्याने मोक्याची सुयोग व नंदी पॅलेस ही हॉटेल्स महामंडळाच्या सदस्य मंडळींनी बळकावली आहेत.पिंपरी-चिंचवडच्या संमेलनाच्या तुलनेत डोंबिवलीतील साहित्य संमेलनास साहित्यिकांची उपस्थिती कमीच दिसून येणार आहे. पिंपरी-चिंचवडच्या संमेलनाचे आयोजन डी. वाय. पाटील विद्यापीठाने केले होते. त्या संमेलनाला येणाऱ्या साहित्यिकांसाठी आयोजकांनी गाड्यांची व्यवस्था करण्याबरोबरच चांगले मानधनही दिले होते. उपस्थिती कमी राहण्याची चिन्हेआगरी युथ फोरमने पाच कोटींचा निधी जमवण्याची भीष्मगर्जना केली होती. परंतु, नोटाबंदी व निवडणूक आचारसंहिता आड आली. त्यामुळे संमेलनाच्या खर्चास आपोआपच कात्री लागली. यायलाजायला गाडी नाही. मानधन मिळणार की नाही. स्वखुशीने मानधन परत केल्यास चांगले. जवळच्या साहित्यिकांनी मानधन घेऊ नये, अशा अपेक्षा व्यक्त होत आहेत. या सगळ्या गोष्टींमुळे साहित्यिकांची उपस्थिती कमीच असणार आहे.