शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

निवासी संकुलांच्या पदाधिकाऱ्यांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2019 01:02 IST

विधानसभा निवडणुकीदरम्यान आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी पहिला गुन्हा भार्इंदर पूर्वेच्या नवघर पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे

मीरा रोड : विधानसभा निवडणुकीदरम्यान आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी पहिला गुन्हा भार्इंदर पूर्वेच्या नवघर पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. येथील नीरा कॉम्प्लेक्सने नवरात्रीनिमित्त बेकायदेशीर कमान उभारून त्यावर महापौर, आमदार व स्थानिक नगरसेवकांच्या जाहिराती केल्याने आचारसंहिता भंग करण्यासह मालमत्ता विद्रूपण प्रतिबंध कायदा तसेच लोकप्रतिनिधी कायद्याखाली भरत परिहार, नीरा कॉम्प्लेक्सचे पदाधिकारी व सदस्य यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. परिहार भाजप पदाधिकारी आहेत.मीरा-भार्इंदर महापालिकेच्या प्रभाग समिती ४ मध्ये प्रभाग अधिकारी नरेंद्र चव्हाण असून, ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघातील आचारसंहिता भरारी पथक क्र. २ चे ते प्रमुख आहेत. भार्इंदर पूर्वेच्या गोल्डन नेस्टजवळील नीरा कॉम्प्लेक्सने बेकायदेशीर कमान उभारून त्यावर महापौर तथा स्थानिक नगरसेविका डिम्पल मेहता, आमदार नरेंद्र मेहता तसेच भाजपचे स्थानिक नगरसेवक हसमुख गेहलोत, अरविंद शेट्टी व डॉ. प्रीती पाटील यांची जाहिरात केली होती. याबाबत छायाचित्रासह तक्रार निवडणूक आयोगाच्या सी व्हिजील अ‍ॅपवर जतीन दधीच यांनी केली होती.या तक्रारीच्या अनुषंगाने नरेंद्र चव्हाणसह भरारी पथक घटनास्थळी पोहोचले असता तेथे जाहिरात फलक लावलेली बेकायदेशीर कमान आढळून आली. पथकाने त्वरित पंचनामा करून ही कमान काढून टाकली. चव्हाण यांनी याप्रकरणी नवघर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी यातील एका इमारतीचे पदाधिकारी भरत परिहार यांच्यासह नीरा कॉम्प्लेक्सचे पदाधिकारी व सदस्य यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.भरत परिहार भाजपचे कार्यकर्ते असून, भाजपच्या गोल्डन नेस्ट मंडळाचे ते सचिवही आहेत. आरोपींमध्ये केवळ परिहार व वसाहतीचे पदाधिकारी, सदस्य यांनाच आरोपी केले असल्याने लोकप्रतिनिधी अधिनियमाखालीही गुन्हा का नोंदवला, असा सवाल जतीन यांनी केला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कमानी उभारण्यास बंदी आहे. वास्तविक, मुख्य रस्त्यालगत ही बेकायदा कमान असताना पालिकेला ती दिसली कशी नाही, असा प्रश्न करत पालिका आयुक्तांसह अधिकारी हे आचारसंहिता भंग करणाºया राजकारण्यांना संरक्षण देत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कमानी उभारण्यास बंदी आहे. त्यातच जाहिरात फलकांवर ज्यांची छायाचित्रे असतील, त्यांना पण आरोपी करा, असे न्यायालयाने स्पष्ट केले असतानाही चव्हाण यांनी महापौर, आमदार, नगरसेवकांना आरोपी केलेले नाही.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीElectionनिवडणूक