पदाधिकारी निवड; भाजपात धुसफूस
By Admin | Updated: February 15, 2016 03:00 IST2016-02-15T03:00:42+5:302016-02-15T03:00:42+5:30
एक महिन्यापूर्वी ठाणे शहर भाजपाने जाहीर केलेल्या पदाधिकारी निवडीवरून नाराज कार्यकर्त्यांमध्ये धुसफूस सुरू आहे. लोकमान्यनगर येथील पदाधिकारी कामताप्रसाद शर्मा यां

पदाधिकारी निवड; भाजपात धुसफूस
जितेंद्र कालेकर, ठाणे
एक महिन्यापूर्वी ठाणे शहर भाजपाने जाहीर केलेल्या पदाधिकारी निवडीवरून नाराज कार्यकर्त्यांमध्ये धुसफूस सुरू आहे. लोकमान्यनगर येथील पदाधिकारी कामताप्रसाद शर्मा यांनी थेट प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याकडेच तक्रार केली असून न्याय न मिळाल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
लोकमान्यनगर- सावरकरनगर मंडळाच्या अध्यक्षांची निवडणूक १४ जानेवारी २०१६ रोजी पार पडली. यामध्ये आदेश भगत, योगेश भोईर आणि कैलास म्हात्रे या निवडणूक अधिकाऱ्यांनी कोणालाही विश्वासात न घेता मंडळ अध्यक्ष म्हणून सचिन मोरे यांचे नाव जाहीर केले, असा आरोपही शर्मा यांनी केला. २३ वर्षांत अशी निवडणूक झाली नाही. जुने मंडळ कार्यकर्ते, अध्यक्ष, माजी नगरसेवक तसेच इच्छुकांना डावलून ही नियुक्ती केल्याने नाराज झालेले शर्मा तसेच लक्ष्मीकांत पाठारे, राकेश गुप्ता, मुकुंद काळे अशा सुमारे २२ कार्यकर्त्यांचा गट एकवटला आहे. त्यांनी ही नाराजी प्रदेशाध्यक्षांसह ठाणे विभागाध्यक्ष खासदार कपिल पाटील, शहराध्यक्ष संदीप लेले, आमदार संजय केळकर आणि नेते रवींद्रनाथ आंग्रे यांच्याकडे व्यक्त केली आहे. मुळात, वॉर्ड कमिटी झाल्याशिवाय मंडळ अध्यक्षाची घोषणा होत नाही. लोकमान्यनगर विभागात वॉर्ड ९ अ आणि ब, १३ ब, १५ ब तसेच २६ ब अशा पाच वॉर्ड अध्यक्षांची नियुक्ती केली नसून वॉर्ड १० च्या अध्यक्षांच्या नियुक्तीलाही आक्षेप घेतला आहे. वॉर्ड १६ मधून नीरज मिश्रा, १५- अमित सिंग, १३ विजय दुबे, २६ किरण दतुरे आणि १४ मुक्तानंद सिंग अशा १४ पैकी केवळ सहा वॉर्ड अध्यक्षांचीच नियुक्ती झाली आहे. सर्व अध्यक्षांची निवड झाल्यानंतरच मंडळ अध्यक्षांची निवड केली जाते. आठ जणांची निवड बाकी असतानाही मंडळ अध्यक्षांची निवड झाल्याने ही नाराजी आहे. मुळात, बुथप्रमुखांच्या नियुक्तीमध्येच मंडळ अध्यक्षांचे नाव घोषित करण्यात आले.