माजी काँग्रेस सरचिटणीसावर गुन्हा

By Admin | Updated: May 23, 2016 02:18 IST2016-05-23T02:18:50+5:302016-05-23T02:18:50+5:30

महिलेची फसवणूक करून तीच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी वसईतील आनंद प्रकाश चौबे या वसई विरार काँगे्रसच्या माजी सरचिटणीसावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे

Offense of former Congress general secretary | माजी काँग्रेस सरचिटणीसावर गुन्हा

माजी काँग्रेस सरचिटणीसावर गुन्हा

सुनिल घरत,  पारोळ
महिलेची फसवणूक करून तीच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी वसईतील आनंद प्रकाश चौबे या वसई विरार काँगे्रसच्या माजी सरचिटणीसावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. दोन वर्षापासून तो सरचिटणीस होता. पण तीन महिन्यांपूर्वी
त्यांना पदमुक्त करण्यात आले होते. सध्या तो आरोपी फरार असून नालासोपारा पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
नालासोपारा पूर्वेकडील साईनगर विभागात राहणाऱ्या एक ५० वर्षीय महिलेच्या घराशेजारी आनंद चौबे वय ५० याने घर घेतले होते. आपल्याकडे काँग्रेस पक्षाचे मोठे पद असून वसई तालुक्यात ४ ते ५ ठिकाणी माझ्या इमारतीचे काम चालू आहे. अशा पिडीत महिलेस भूलथापा देवून तिच्याशी मैत्री करून तिच्याकडील ११ लाख ५० हजार रूपये रोख, ७ तोळे सोन्याचे दागिने आणि २ किलो चांदीची बिस्कीटे असा मुद्देमाल घेतला काही दिवसानंतर घेतलेला मुद्देमाल परत दे असा तगादा महिलेने चौबेकडे लावला. त्यांनतर त्याने चिंचपाडा येथे काम सुरू असलेल्या आपल्या इमारतीतील रूम व दुकानाचे गाळे मुद्देमालाच्या बदल्यात देतो असे पिडीत महिलेला आश्वासन दिले.
परंतु त्याने रूम दुकानाचे गाळे देण्याची टाळाटाळ केल्याने आपण फसवले गेलो असे त्या महिलेच्या लक्षात आल्यानंतर येताच त्या महिलेने तगादा वाढविल्याने तिला चिंचपाडा येथील इमारत दाखविण्याच्या बहाण्याने कारमध्ये बसवून रस्त्यातच तिच्यावर बलात्कार केला, असे फिर्यादीने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

Web Title: Offense of former Congress general secretary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.