शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

दाऊद इब्राहिमच्या निकटस्थासह त्याच्या साथीदारांविरूद्ध ठाण्यात फौजदारी कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 18:32 IST

ठाणे : इमारतीच्या वादातून अंबरनाथ येथील एका बांधकाम व्यावसायिकाचे बंदुकीच्या धाकावर अपहरण करून त्याला धमकी देणार्‍या कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमच्या निकटस्थासह त्याच्या साथीदारांविरूद्ध ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ठाण्याच्या खंडणी विरोधी पथकाने गुरूवारी रात्री ही कारवाई केली.अंबरनाथ येथील बांधकाम व्यावसायिक सुरोजित मनिंद्र रॉय यांनी एप्रिल २00८ मध्ये अंधेरी स्पोर्टस् कॉम्प्लेक्सजवळच्या ...

ठळक मुद्देइमारतीच्या भागिदारीचा वादअंबरनाथच्या बांधकाम व्यावसायिकास धमक्यारियाज भाटीचा पोलिसांकडून शोध

ठाणे : इमारतीच्या वादातून अंबरनाथ येथील एका बांधकाम व्यावसायिकाचे बंदुकीच्या धाकावर अपहरण करून त्याला धमकी देणार्‍या कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमच्या निकटस्थासह त्याच्या साथीदारांविरूद्ध ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ठाण्याच्या खंडणी विरोधी पथकाने गुरूवारी रात्री ही कारवाई केली.अंबरनाथ येथील बांधकाम व्यावसायिक सुरोजित मनिंद्र रॉय यांनी एप्रिल २00८ मध्ये अंधेरी स्पोर्टस् कॉम्प्लेक्सजवळच्या स्टेडियम व्ह्यू को-आॅपरेटिव्ह सोसायटीची जमीन विकसित करण्यासाठी घेतली होती. त्यासाठी रॉय यांनी त्यांच्या रॉय अ‍ॅण्ड असोसिएटस्च्या नावे स्टेडियम व्ह्यू को-आॅपरेटिव्ह सोसायटीसोबत रितसर करारनामा केला होता. डिसेंबर २00९ मध्ये आर्थिक अडचणींमुळे त्यांनी या कामासाठी मितेश रुगाणी आणि नितीन रतिलाल ढक्कन यांच्या मालकीच्या बोरिवली येथील सॉलिटर रिअल्टर्ससोबत भागिदारी केली. त्यानंतर ए.आर.के. डेव्हलपर्सचे भागीदार रियाज भाटी आणि अफगान बाबू खान यांनी रॉय यांना करारनामा रद्द करण्यासाठी फोनवरून धमक्या देण्यास सुरूवात केली. करारनामा रद्द करण्यासाठी सही न दिल्यास टोळीतील साथीदारांच्या मदतीने ठार मारण्याच्या धमक्या रॉय यांना मिळू लागल्या. आॅगस्ट २0१२ मध्ये अफगान खान आणि रियाज भाटी त्यांच्या साथीदारांसोबत रॉय यांच्या कार्यालयात गेले. त्यांनी रॉय यांच्यावर बंदूक रोखून पुन्हा धमक्या दिल्या. त्यानंतर १५ दिवसांनी आरोपींनी एका कारमध्ये बळजबरी बसवून वांद्रे येथील निबंधक कार्यालयात नेले. तिथे करारनामा रद्द करण्याच्या कागदपत्रांवर आरोपींनी आपल्या सह्या घेतल्याचे रॉय यांनी तक्रारीमध्ये म्हटले आहे. ठरल्याप्रमाणे आरोपींनी स्टेडियम व्ह्यू को-आॅपरेटिव्ह सोसायटीच्या इमारतीमध्ये ४५00 चौरस फुटाचे बांधकाम आणि १ कोटी रुपये न देता केवळ ३0 लाख रुपये दिले. ठरल्याप्रमाणे आपला हिस्सा मागितला असता आरोपींकडून ठार मारण्याच्या धमक्या दिल्या जातात, असे रॉय यांनी म्हटले आहे. त्यांच्या तक्रारीवरून ए.आर.के. डेव्हलपर्सचे भागीदार रियाज भाटी, अफगान बाबू खान आणि कमल जेदवानी यांच्यासह त्यांच्या साथीदारांविरूद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुरूवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला.कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमच्या निकटवर्तियांपैकी एक असलेल्या रियाज भाटी आणि त्याच्या साथीदारांविरूद्ध ठाण्यात गुरूवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. अंबरनाथ येथील एका बांधकाम व्यावसायिकास त्यांनी धमकावल्याचा आरोप आहे.

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिस