सव्वादोन लाखांच्या बनावट नोटा हस्तगत, झारखंडच्या एका आरोपीस ठाण्यात अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 02:20 AM2018-02-15T02:20:58+5:302018-02-15T02:21:10+5:30

बनावट नोटा विकण्यासाठी ठाण्यात आलेल्या झारखंडच्या एका आरोपीस खंडणीविरोधी पथकाने मंगळवारी ठाण्यात अटक केली. आरोपीजवळून सुमारे सव्वादोन लाख रुपयांच्या बनावट नोटा पोलिसांनी हस्तगत केल्या.

Sawwadon lakhs fake currency notes, Jharkhand one accused arrested in Thane | सव्वादोन लाखांच्या बनावट नोटा हस्तगत, झारखंडच्या एका आरोपीस ठाण्यात अटक

सव्वादोन लाखांच्या बनावट नोटा हस्तगत, झारखंडच्या एका आरोपीस ठाण्यात अटक

Next

ठाणे : बनावट नोटा विकण्यासाठी ठाण्यात आलेल्या झारखंडच्या एका आरोपीस खंडणीविरोधी पथकाने मंगळवारी ठाण्यात अटक केली. आरोपीजवळून सुमारे सव्वादोन लाख रुपयांच्या बनावट नोटा पोलिसांनी हस्तगत केल्या.
प्रकास प्रसाद ऊर्फ शंकर टोकल मोहतो (४२) हे आरोपीचे नाव असून तो ज्ञानसाधना महाविद्यालयाजवळील धर्मवीरनगरचा रहिवासी आहे. तो मूळचा झारखंडमधील हजारीबाग जिल्ह्याचा रहिवासी आहे. ६० हजार रुपयांत एक लाख रुपयांच्या बनावट नोटा विकण्याचा धंदा तो करत असल्याची गोपनीय माहिती खंडणीविरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे यांना मिळाली. त्यानुसार, या पथकाच्या अधिकाºयांनी त्याला पकडण्यासाठी सापळा रचला. पोलिसांनी ग्राहक बनून आरोपीशी संपर्क साधला. त्याला २५ लाखांच्या बनावट नोटा मागितल्या होत्या. मंगळवारी दुपारी तो नोटा घेऊन येण्यास तयार झाला. त्यानुसार, पोलीस उपनिरीक्षक एस.आर. गावंड, एच.ए. ढोले आणि व्ही.के. बाबर आदींच्या पथकाने सापळा रचला. दुपारी आरोपी ज्ञानसाधना महाविद्यालयासमोर पोहोचताच पोलिसांनी त्याला अटक केली. आरोपीच्या अंगझडतीत दोन हजार रुपयांच्या ११३ आणि नवीन ५०० रुपयांच्या १० बनावट नोटा आढळल्या. याशिवाय, १०० रुपयांच्या दोन खºया नोटाही होत्या. एकूण दोन लाख ३१ हजार २०० रुपये पोलिसांनी आरोपीजवळून हस्तगत केले.


फोटो : 14ठाणे-करन्सी
खंडणीविरोधी पथकाने हस्तगत केलेल्या बनावट नोटा.

बांगलादेशात धागेदोरे
आरोपी बनावट नोटा बांगलादेशातून आणत असल्याची माहिती तपासात आहे. बांगलादेशातून ३० हजार रुपयांमध्ये एक लाख रुपयांच्या बनावट नोटा आणतो. त्या नोटा ६० हजार रुपयांमध्ये भारतात विकत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे यांनी दिली.

Web Title: Sawwadon lakhs fake currency notes, Jharkhand one accused arrested in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा