शहरं
Join us  
Trending Stories
1
११ युवकांचं ब्रेनवॉश करण्यासाठी... ; दिल्ली स्फोटातील दहशतवादी डॉ. उमरबाबत आणखी धक्कादायक माहिती उघड
2
राज ठाकरेंमुळे काँग्रेस आणि ठाकरे गटात दुरावा?, वर्षा गायकवाड म्हणाल्या, ‘त्यांना सोबत घेण्यापूर्वी…’  
3
जमीन घोटाळ्यात पार्थ पवारांना वगळले! अंबादास दानवे म्हणाले, '९९% भागीदारी असताना चौकशी अहवालात नाव कसं नाही?'
4
वेदनादायी! ऑस्ट्रेलियात BMW ची भारतीय महिलेला धडक, जागीच मृत्यू; होती ८ महिन्यांची गर्भवती
5
अनगरात 'सही'चा खेळ! अर्ज बाद होताच उज्ज्वला थिटेंचा आरोप, 'मुलगा सोबत असूनही सही राहिलीच कशी?
6
तुमचा आधार पुन्हा एकदा बदलणार; आता ना नाव असेल ना पत्ता, फक्त फोटोसोबत असेल QR कोड
7
भारतीय तटरक्षक दलाची मोठी कारवाई; बांगलादेशाच्या तीन नौका जप्त, 79 जणांना अटक
8
काल हिडमाचा खात्मा, आज ‘टेक शंकर’सह 7 नक्षलवादी ठार; आंध्र-ओडिशा सीमेजवळ भीषण चकमक
9
VVPAT: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत 'व्हीव्हीपॅट' वापरण्यास आयोगाचा नकार, कारणही सांगितलं!
10
५४ तास विपरीत महालक्ष्मी राजयोग: ५ राशींना ४ पट लाभ, पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ; अकल्पनीय फायदा!
11
संरक्षण, विमा आणि धातू क्षेत्रातील 'या' ५ कंपन्यांचे शेअर्स येणार तेजीत! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज
12
Video: "अजित पवार, सगळ्यांचा नाद करायचा, पण..."; भाजपा नेते राजन पाटलांच्या मुलाचं थेट चॅलेंज
13
‘ही मुलगी आमच्या मुलाची नाही’, सासू-सासरे सारखा घ्यायचे संशय, संतप्त सुनेने केलं भयंकर कृत्य
14
Rinku Singh Century In Ranji Trophy : टी-२० स्टार रिंकू सिंहचा रेड बॉल क्रिकेटमध्ये शतकी धमाका!
15
आता काळ बदलतोय! घर सांभाळण्यासाठी कपलने ठेवला 'होम मॅनेजर'; महिन्याला १ लाख पगार
16
हृदयद्रावक! डीजेवर नाचताना हवेत गोळीबार; नवरदेवाच्या मित्राच्या मुलीने गमावला जीव
17
'इंग्लिश विंग्लिश'मधली छोटी मुलगी आता दिसते सुंदर; अभिनेत्रीचं अरेंज मॅरेज ठरलं; म्हणाली...
18
रशियाने भारताला दिली एक खतरनाक ऑफर, पाकिस्तानचं टेन्शन वाढलं, आली डोळे पांढरे होण्याची वेळ
19
'AI वर आंधळा विश्वास ठेवू नका; यातील गुंतवणुकीचा फुगा कधीही फुटू शकतो' सुंदर पिचाईं यांचा इशारा!
20
Numerology 2026: अंकशास्त्रानुसार २०२६ हे इच्छापूर्तीचे वर्ष? कोणते बदल केले पाहिजेत?
Daily Top 2Weekly Top 5

ऑक्टोबर हिटचे निवडणूक प्रचाराला बसत आहेत चटके

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2019 00:05 IST

विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाली असून अर्ज दाखल झाल्यानंतर प्रत्येक मतदारसंघात मतदारापर्यंत पोहचण्यासाठी उमेदवारांची कसरत सुरू झाली आहे.

ठाणे : आॅक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पावसाने ठाणे जिल्ह्यात हजेरी लावली होती. परंतु, आता सूर्य तळपायला लागला असून ठाण्याच्या पारा ३५ अंश सेल्सिअसवर पोहचला आहे. त्यामुळे प्रचार करतांना उमेदवारांसह कार्यकर्त्यांचीही दमछाक होत आहे. दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढत असल्यामुळे या काळात फिरल्यास चक्कर येणे, उलटी, जुलाब असे आजारही बळावण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे शरीरातील उर्जा कमी होऊन आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. अशा वेळेस आरोग्याची काळजी घेणे हे खूप महत्त्वाचे असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाली असून अर्ज दाखल झाल्यानंतर प्रत्येक मतदारसंघात मतदारापर्यंत पोहचण्यासाठी उमेदवारांची कसरत सुरू झाली आहे. परंतु, त्यांच्यासोबत त्यांच्या कार्यकर्त्यांचीही दमछाक होऊ लागली आहे. त्यातच आॅक्टोबर हीटचे चटकेही बसू लागले आहेत. त्यामुळे सकाळी लवकर प्रचार केल्यानंतर दुपारी १ ते ५ वाजेपर्यंत आराम करून पुन्हा सायंकाळी सुर्य मावळ्यानंतर प्रचार केला जात आहे. असे असले तरी उन्हा तान्हाचा प्रचार करतांना तहान लागणे, चक्कर येणे, उलटी, जुलाब असे आजार बळावण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यात उमेदवार हा शक्यतो वाहनातून किंवा रथामधून आपला प्रचार करीत असतो. मात्र, कार्यकर्ते हा पायी चालत असल्याने त्यांची दमछाक उडतांना दिसत आहे. त्यामुळे अशा वेळेस काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.प्रचारात या गोष्टी टाळा : सध्या ठाण्याचा पारा मागील काही दिवसापासून वाढतांना दिसत आहे. दोन दिवसांपूर्वी तो ३५ अंशापर्यंत पोहचला होता. येत्या काही दिवसांत त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकूणच उन्हातून प्रचार करतांना शक्यतोवर भडक कपडे घालू नये, डोक्यावर टोपी असणे आवश्यक आहे. सोबत पाण्याची बाटली ठेवावी, कोल्ड ड्रिंक्स किंवा हॉट ड्रिंक्स पिणे टाळावे, बर्फ गोळा खाणे टाळावे, थंड पेय पिऊ नये, नारळ पाणी प्यावे, डोक्याला रुमाल बांधावा, शक्यतो दुपारी १२ ते ४ वाजेपर्यंत प्रचार करणे टाळावे. कोल्डड्रींक पिण्यापेक्षा साधे पाणी पिण्यावर अधिक भर दिल्यास अनेक समस्यांपासून सुटका होऊ शकेल असे तज्ज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे. तसेच दुपारी १२ ते ४ वाजेपर्यंत शक्यतो प्रचार टाळावा असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.

टॅग्स :thaneठाणेMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019