शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

गणरायांच्या वाटेत खड्ड्यांचे विघ्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2019 23:54 IST

अंतर्गत रस्त्यांची तात्पुरती डागडुजी निरर्थक : पावसाचा डांबरीकरणाला खोडा

डोंबिवली : गणेशोत्सवाला सोमवारपासून प्रारंभ होत असताना या पार्श्वभूमीवर खड्डेमय रस्त्यांची तात्पुरती केलेली डागडुजी निरर्थक ठरली आहे. खड्ड्यांच्या भोवताली मारलेले पॅच पुन्हा उखडल्याने खड्डेमय स्थिती निर्माण झाली. त्याचबरोबर कामाच्या गुणवत्तेचीही पोलखोल झाली आहे. यात शुक्रवारपासून पावसानेही हजेरी लावल्याने डांबरीकरणाच्या कामांनाही खोडा बसल्याने यंदाही गणरायांच्या आगमनाच्या वाटेत खड्ड्यांचे विघ्न कायम आहे.

बहुतांश रस्त्यांमधील खड्डे डांबरीकरणाने भरल्याचा दावा केडीएमसीकडून केला जात आहे. मात्र, अनेक भागांत आजही खड्ड्यांमुळे रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. याप्रकरणी शनिवारी मनसेतर्फे डोंबिवली विभागीय कार्यालयावर मोर्चा काढून खड्डेरत्न पुरस्कार देण्यात आला होता. त्यात आता ज्या रस्त्यांवरील खड्ड्यांच्या जागी डांबरीकरणाचे पॅच मारले होते. तेही आता पूर्णपणे उखडले गेले आहेत. दोन दिवसांच्या पडलेल्या पावसाने डांबर वाहून गेल्याने पुन्हा खड्डे निर्माण झाल्याचे चित्र ठाकुर्लीतील म्हसोबा चौक ते पंचायत बावडीदरम्यान प्रामुख्याने दिसून येते. कोपर उड्डाणपुलावरून अवजड वाहनांना बंदी घातल्याने म्हसोबा चौक ते पंचायत बावडी या मार्गानेच कल्याणमार्गे तसेच चोळगाव मार्गाने येणाऱ्या त्या वाहनांची वाहतूक होत आहे.खड्ड्यांमुळे वाहतूक मंदावून या ठिकाणी सद्य:स्थितीला कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. ही परिस्थिती शहरात अन्य ठिकाणीही पाहायला मिळत आहे. खड्ड्यांच्या अवतीभोवती मारलेल्या पॅचच्या ठिकाणी डांबर निघू लागल्याने दुचाकी घसरण्याचाही धोका निर्माण झाला आहे. पश्चिमेकडील बावनचाळीतील काँक्रिटीकरणाच्या रस्त्याला लागून असलेल्या डांबराच्या रस्त्यांची पुरती वाट लागली आहे. पश्चिमेला ज्या ठिकाणी गणपती मंदिराचा पादचारी पूल उतरतो, तिथेही मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. दुसरीकडे पावसाचे आगमन झाल्याने परिस्थिती अधिकच बिकट बनली आहे. त्यामुळे डांबरीकरणाच्या कामांनाही ब्रेक लागल्याचे दिसत आहे. आधीच खड्डेमय रस्ते, त्यात तात्पुरती डागडुजी केलेले रस्त्यांवरील डांबरही निघून पुन्हा खड्डे निर्माण झाल्याचे चित्र कल्याण पश्चिम आणि पूर्व भागातही बहुतांश ठिकाणी पाहायला मिळत आहे. खडी बाहेर निघाल्याने वाहनांच्या टायरमुळे उडून तिच्यामुळे दुखापत होण्याचीही भीती पादचाऱ्यांकडून व्यक्त होत आहे. रविवारीही पावसाची रिपरिप सुरूच राहिल्याने खड्डेमय स्थिती ‘जैसे थे’च राहण्याची चिन्हे आहेत.डांबर टाकताना त्यातील तापमान योग्य पाहिजे, डांबराच्या जाडीचा थर समप्रमाणात असणे आवश्यक आहे. डांबराचा नमुना तपासणे महत्त्वाचे आहे. जेथे काम सुरू आहे, तिथे फिल्ड लॅब असणे बंधनकारक आहे, याकडे पुरते दुर्लक्ष झालेले आहे.‘हे’ खड्डे कधी बुजविणार?एकीकडे केडीएमसीने आपल्या अखत्यारीतील बहुतांश खड्डे डांबराने भरल्याचा दावा केला असताना सार्वजनिक बांधकाम विभागाला घरडा सर्कल ते टाटानाका या त्यांच्या अखत्यारीतील रस्त्यांवरील खड्डे भरायला अद्याप मुहूर्त मिळालेला नाही.खंबाळपाडा, न्यू कल्याण रोड म्हणून ओळखल्या जाणाºया या रस्त्याच्या सावित्रीबाई फुले नाट्यगृहातील चौक परिसराची खड्ड्यांनी पुरती चाळण केली आहे. पुढे विकासनाका परिसरातही मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. खंबाळपाडा रोडनजीकच चोळेगाव तलाव असून या ठिकाणी विसर्जनासाठी मोठ्या प्रमाणात गणेशमूर्तींना आणले जाते.गणरायांचे आगमन खड्ड्यांतून होत असताना विसर्जनापूर्वी तरी हे खड्डे बुजतील का, असा सवाल गणेशभक्तांकडून उपस्थित केला जात आहे. खंबाळपाडा ते म्हसोबा चौकात जाणाºया ९० फूट रस्त्यांवरही खड्ड्यांचे साम्राज्य असून खोलवर गेलेल्या खड्ड्यांतून मार्ग काढताना जीव मुठीत घेऊनच वाहने चालवावी लागत आहेत.कोपर उड्डाणपुलावरही खड्डेकमकुवत झाल्याने अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद केलेला डोंबिवली पूर्व-पश्चिम जोडणाºया कोपर उड्डाणपुलावरही मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत.या पुलावरून सध्या अवजड वाहने वगळता अन्य वाहनांची वाहतूक सुरू आहे. पूल कमकुवत झाल्याने त्यावरील वजन कमी करण्यासाठी त्यावरील तीन ते चार इंच डांबराचा थर कमी केला आहे.आता पुलावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून पावसाचे पाणीही साचत असल्याने खड्ड्यांची खोली समजून येत नसल्यामुळे येथून वाहन नेताना चालकांना कसरतच करावी लागत आहे. 

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाdombivaliडोंबिवली