शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

आश्रमशाळांच्या ऑनलाइन शिक्षणात अडथळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2020 01:13 IST

Thane News : शाळांमधील शिक्षक सध्या आदिवासी कुटुंबांना खावटी अनुदानाचा लाभ देण्याच्या दृष्टीने लाभार्थी परिवारांच्या सर्वेक्षणाचे काम करीत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील या शाळांच्या विद्यार्थ्यांना दैनंदिन ऑनलाइन शिक्षण घेण्यात अडथळा निर्माण होत असल्याचे वास्तव ग्रामीण, दुर्गम भागात दिसून येत आहे.

 ठाणे : जिल्ह्यातील २३ शासकीय तसेच सहा अनुदानित आश्रमशाळा आदी बहुतांश शाळांमधील शिक्षक सध्या आदिवासी कुटुंबांना खावटी अनुदानाचा लाभ देण्याच्या दृष्टीने लाभार्थी परिवारांच्या सर्वेक्षणाचे काम करीत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील या शाळांच्या विद्यार्थ्यांना दैनंदिन ऑनलाइन शिक्षण घेण्यात अडथळा निर्माण होत असल्याचे वास्तव ग्रामीण, दुर्गम भागात दिसून येत आहे.या आश्रमशाळांमधील विद्यार्थी जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यांतील गावखेड्यांमधील आहेत. त्यामुळे त्यांना ऑनलाइन शिक्षण देण्याचे नियोजन केले आहे. परंतु, गेल्या २० दिवसांपासून या शाळांचे बहुतांश शिक्षक सकाळपासून संध्याकाळपर्यंत गावपाड्यांमध्ये खावटी अनुदान लाभार्थी शोधण्याच्या सर्वेक्षणात गुंतले आहेत. जिल्ह्यात सध्या सुगीचा काळ असल्याने आदिवासीबांधव दिवसभर शेतावरच असतात. त्यामुळे सर्वेक्षणाची ही जबाबदारी पूर्ण करण्यासाठी शिक्षकांसह शिक्षिकांना संध्याकाळीदेखील लाभार्थी परिवारांचे घर गाठून सर्वेक्षणाचे काम पूर्ण करावे लागत आहे. शासनाने नेमलेल्या या सर्वेक्षण समितीत ग्रामसेवकांचासुद्धा समावेश आहे. परंतु, आदिवासी विकास विभागाचे काम करणार नसल्याचा इशारा ग्रामसेवक संघटनेने ठाणे जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला आहे. त्यामुळे काही ठिकाणी सर्वेक्षणाचा अतिरिक्त भार शिक्षकांवर पडला आहे. सर्व प्रकारच्या सर्वेक्षणातून शिक्षकांना मुक्त करून ऑनलाइन शिक्षण अखंडितपणे सुरू ठेवण्याच्या सूचना शासनाने आधीच दिलेल्या आहेत. त्यामुळे या सूचनांचे पालन अपेक्षित असल्याचे या शिक्षकांचे म्हणणे आहे.  तर, विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील अनियमितपणाविरोधात पालकांतही तीव्र नाराजी आहे. 

या सर्वेक्षणाचे काम शिक्षकांकडून सुरू आहे. पण, या शिक्षकांकडून रोटेशन पद्धतीने विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिकवले जात आहे. त्यामुळे शिकवण्याच्या कामात कोणताही अडथळा आलेला नाही. ग्रामसेवकांनी काम करण्यास विरोध केल्याचे ऐकिवात नाही. या सर्वेक्षणाद्वारे संकलित लाभार्थी परिवारांची आकडेवारी अजून प्राप्त झालेली नाही.     - रंजना किल्लेदार, प्रकल्प अधिकारी    एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प     कार्यालय, शहापूर

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रTeacherशिक्षकStudentविद्यार्थी