शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
6
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
7
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
8
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
9
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
10
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
11
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
12
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
13
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
14
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
15
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
16
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
17
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
18
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
19
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
20
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू

टाउनशिपच्या मार्गात हरकतींचा ब्रेक, लेखी हमी हवी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2020 1:58 AM

केडीएमसीने सापाड व वाडेघर येथे विकास परियोजनेचा पहिला टप्पा राबवण्यासाठी सरकारतर्फे राजपत्रित अधिसूचना काढून हरकती, सूचना मागवल्या आहेत.

- मुरलीधर भवारकल्याण : केडीएमसीने सापाड व वाडेघर येथे विकास परियोजनेचा पहिला टप्पा राबवण्यासाठी सरकारतर्फे राजपत्रित अधिसूचना काढून हरकती, सूचना मागवल्या आहेत. त्यासाठी महिनाभराचा कालावधी होता. हा कालावधी संपण्यापूर्वी सात दिवस आधी योजना समजून सांगितल्याने हरकती, सूचना घेण्यास कमी वेळ मिळाल्याचा मुद्दा सापाड व वाडेघर ग्रामस्थ मंडळाने मांडला होता. तसेच प्रकल्पात बाधित होणाऱ्यांना लेखी हमी दिल्याशिवाय ही योजना राबवू नये, अशी ५०० जणांच्या वतीने ग्रामस्थ मंडळाने एक संयुक्तिक हरकत घेतली आहे.महापालिकेने शहर नियोजन योजनेंतर्गत तयार केलेली विकास परियोजना सापाड व वाडेघर येथील २८४ हेक्टर जागेवर राबवण्यास सरकारने मंजुरी दिली आहे. त्यामुळे महापालिकेने राजपत्रित अधिसूचना काढून २५ डिसेंबर २०१९ ते २५ जानेवारी २०२० दरम्यान या प्रकल्पासाठी हरकती, सूचना मागविल्या आहेत. मात्र, सापाड-वाडेघर येथे ही योजना राबवण्यात येणार असल्याची पूर्वकल्पना ग्रामस्थांना दिलेली नाही. राजपत्रित सूचना जाहीर झाल्यावर महापालिकेने थेट हरकती, सूचना मागविल्या. मात्र, योजना नेमकी काय आहे, याची माहिती हरकती, सूचना मागवण्यापूर्वी दिली असती, तर ग्रामस्थांना हरकती व सूचना चांगल्या प्रकारे मांडता आल्या असत्या, याकडे ग्रामस्थांनी लक्ष वेधले आहे. महापालिकेने १८ जानेवारीला यासंदर्भातील माहिती ग्रामस्थांना दिल्यावर ग्रामस्थ मंडळाने ५०० जणांतर्फे हरकत घेतली आहे.सापाड व वाडेघर ही गावे ग्रामपंचायतींत असताना ती पालिकेत समाविष्ट केली गेली. त्यावेळची घरे महापालिकेत अधिकृत केलेली नाहीत. या योजनेचा मोबदला जागेच्या स्वरूपात मिळणार असेल, तर त्याची माहिती सातबाराधारक जमीनमालकांना दिलेली नाही. तसेच नोटिसा व पूर्वसूचना दिलेली नाही. पालिका हरकती, सूचना मागविण्याचा फार्स करणार असेल व त्यावर लवाद नेमण्याच्या तयारीत असेल, तर ही शुद्ध फसवणूक होऊ शकते. या योजनेसाठी जागा घेण्यापूर्वी किंवा त्या घेतल्यानंतर आमच्यासोबत मोबदल्याची चर्चा केली जाणार आहे का, असा संभ्रमही जागामालकांमध्ये आहे. योजनेसाठी २८४ हेक्टर जागा लागणार आहे. मात्र, तेथे शेतजमीन मोठ्या प्रमाणात आहे.तसेच काही जमिनीवर गाव व वस्ती असल्याने तेथे घरे आहेत. या परिसराला स्मार्ट लूक देताना व नियोजनबद्धता आणण्यासाठी महापालिका कंत्राट देणार आहे. त्यात भूमिपुत्र व ज्यांची जमीन घेतली जाणार आहे, त्यांचा विचार झाला पाहिजे. या सगळ्या हरकतींसंदर्भात महापालिकेने ग्रामस्थ मंडळास लेखी हमी दिल्यास योजनेचा मार्ग पुढे खुला ठेवला जाईल, अन्यथा योजनेला विरोध करणार असल्याचे ग्रामस्थ मंडळाने सांगितले. दरम्यान, ही हरकत ग्रामस्थांनी महापालिका आयुक्त, तहसीलदार, महापालिकेचे सहायक संचालक नगररचनाकार यांच्याकडे नोंदविली आहे. हरकती घेण्यासाठी अपुरा वेळ मिळाला, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे १८ ते २५ जानेवारीदरम्यान किती हरकती आल्या, याची माहिती २५ जानेवारीनंतरच नगररचना विभागाकडून दिली जाणार आहे.ग्रोथ सेंटर होणार की गुंडाळणार?केडीएमसीत समाविष्ट केलेल्या २७ गावांमध्ये कल्याण ग्रोथ सेंटरची घोषणा सप्टेंबर २०१५ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यासाठी एक हजार ८९ कोटी रुपये मंजूर केले होते. एक हजार ८९ हेक्टर जमिनीवर ग्रोथ सेंटर विकसित केले जाणार होते. ही योजना शहर नियोजन योजनेचीच होती. मात्र, त्याची एक वीटही अद्याप रचलेली नाही. त्यालादेखील २७ गावांतील ग्रोथ सेंटरबाधित १० गावांसह सर्वपक्षीय संघर्ष समितीचा विरोध कायम आहे. आता राज्यात सरकार बदलले आहे. त्यामुळे भाजपच्या योजना मार्गी लागणार की गुंडाळल्या जाणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :thaneठाणेkdmcकल्याण डोंबिवली महापालिका